मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव या माध्यमिक शाळेत गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री अभय शेरलेकर यांच्या शुभहस्ते ओझर विद्या मंदिरचे संस्थापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगावचे राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक स्वर्गीय वसंत विश्राम पाटील यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गुरुपौर्णिमेचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे म्हणून शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री.पी.के. राणे तसेच साहाय्यक शिक्षक श्री प्रवीण पारकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करुन आजच्या दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. श्री शेरलेकर सर यांनी आभार व्यक्त करताना संस्कारक्षम व आदर्श विद्यार्थी म्हणून सर्वांनी त्याप्रमाणे आचरण करावे असे आवाहन विद्यार्थ्याना केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री डी डी जाधव, शिक्षक श्री. नितिन परुळेकर, एस.जे.सावंत, सौ.वराडकर, शिक्षकेतर कर्मचारी श्री.आर.जे.जाधव, पी. व्ही.खोडके, मधुसूदन परुळेकर, आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
ओझर विद्यामंदिर येथे गुरु पूर्णिमा उत्सव साजरा
29
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -