मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानि संपन्न झाला. स्वामी समर्थ नामाच्या जयघोषाने मठाचा परिसर दुमदुमून गेला होता. उत्सव निमित्त स्वामी समर्थ मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळ नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने हजारो भाविक स्वामी चरणी नतमस्तक झाले. पहाटे स्वामी मुर्तीवर अभिषेक, श्री ची पादुका पूजा, अभिषेक, श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने आयोजित केलेल्या सामूहिक गुरुलीलामृत पोथी पारायण सांगता झाली. त्यानंतर नामस्मरण, महाआरती महाप्रसाद तसेच दुपारी देवगड तालुक्यातील दहावी परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिरगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विजयकुमार कदम यांच्या हस्ते झाला. सायंकाळी भवानी जंक्शन वारकरी भजन दिंडी दाभोळे राऊतवाडी यांचा दिंडी कार्यक्रम झाला. श्री स्वामी समर्थ हडपीड मठाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे व संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न!
20
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -