मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहर पोलिस ठाण्याला ‘दक्ष युवक भारत संघटना आणि युथ बीटस् फाॅर क्ल्यायमेट संस्था’ या दोन महत्वाच्या युवा चळवळीच्या अध्यक्षांनी भेट दिली. १ जुलैला झालेल्या या सदिच्छा भेटीत दक्ष युवक भारत संघटने मार्फत पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांना सदाफुलीच्या फुलांचे रोपटे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळेस पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी सकारात्मक संवाद प्रतिसाद दिला. दक्ष युवक भारत संघटनेच्या अध्यक्षा मिली मिश्रा, सचिव आदित्य बटावले आणि युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या अध्यक्षा मेगल डिसोझा, दोन्ही संघटनेतील सदस्य राहुल जाधव, दर्शन वेंगुर्लेकर हे उपस्थित होते.
या भेटीत प्रामुख्याने अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन उपक्रम तथा अँटी ड्रग्स मार्गदर्शन कार्येक्रम व क्लायमेट – पर्यावरण बद्दल काम करण्या संदर्भात पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्याशी जागरुक युवांनी संवाद साधला. या भेटी नंतर दोन्ही युवा संस्थांच्या अध्यक्षांनी पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला ह्या वरील विषयांबाबत गंभीर आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्या या समस्यावर काम करण्यास सज्ज आहेत अशीही पुस्ती जोडली. या चर्चे दरम्यान वेळेस दक्ष युवक भारत संघटना मार्फत महत्त्वाचे म्हणजे अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यास संदर्भात शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे व पोलिस विभाग सोबत मिळून एकत्र काम करण्यास आपण इच्छुक आहोत अशी माहिती दक्ष भारत संघटनेच्या युवकांनी दिली तेंव्हा पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी सकारात्मक चर्चा केली व युवक व पोलिस विभाग एकत्र काम करूया अशी ग्वाही दिली. पुढील आठवड्या पासूनच एकत्र काम करायला सुरुवात करुया असे म्हणताना त्यांनी कुडाळ तालुक्यातील प्रत्येक आठवड्यात किमान २ शाळा किंवा महाविद्यालय निवडून तिथे जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल ज्यात लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात जनजागृती, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, सोशल मीडियाचा अती वापर अशा सामाजिक विषयांवर मार्गदर्शन उपक्रम सुरु केले जातील.
दुसरा विषय म्हणजे क्लायमेट चेंज व पर्यावरण संदर्भात चर्चा करण्यात आली. युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोझा यांनी संस्थेच्या कामासंदर्भात माहिती दिली. सुरुवाती पासून कसे काम चालू केले व आता पर्यंतचा संपूर्ण प्रवास हा मेगल डिसोजांनी थोडक्यात सांगितला. त्याबद्दल देखील निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी प्रतिसाद दिला व त्याबद्दल देखील चर्चा करण्यात आली.