पूरग्रस्तांनी गृपच्या सदस्यांचे मानलेआभार…!
कणकवली | उमेश परब : बांदा येथे झालेल्या अतिवृष्टीचा फटका साईमंदिर येथील राकेश केसरकर यांच्यासह २० कुटुंबीयांना बसला होता. या पूरग्रस्तांना आधार ग्रुप टेंबवाडीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन मदतीचा आधार दिला.
यावेळी वैभव मालंडकर, नयन यादव, बाळकृष्ण यादव, दिनेश पेडणेकर, विशाल पेडणेकर, किशोर घुरसाळे, महेंद्र सावंत, विक्रांत सावंत, आतिश कांदळकर, सोमनाथ पाटगावकर, प्रथमेश परब, तुषार गोवणकर, साईनाथ वालावकर, सुहास सूर्यवंशी, महादेव चव्हाण, बबन गोळवणकर, साईप्रसाद गोळवणकर आदी उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, गहू, कांदे-बटाटे, मसाले, तेल, भांडी धुण्याचा साबण, टूथपेस्ट वगैरे वस्तूंचा समावेश होता. ही मदत केल्याबद्दल साईभक्त राकेश केसरकर यांनी आधार गृपच्या सदस्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला. समाजाचे आम्ही देणे लागतो या भावनेतून आम्ही ही पूरग्रस्तांना मदत केली आहे. ही समाजसेवा करण्याचे हे निमित्त आहे. कर्ता करविता हा परमेश्वर असतो. या समाजसेवेची संधी आम्हाला लाभली. यासाठी परमेश्वराचे मनापासून प्रार्थना अशी प्रतिक्रिया आधार ग्रुप चे अध्यक्ष प्रथमेश परब यांनी व्यक्त केली.