24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अन्यथा मालवणच्या पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरवणार ; श्रावण ग्रामस्थ व पालकांचा संताप.

- Advertisement -
- Advertisement -

श्रावणातील शाळेला टाळे ; संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण विभागावर केला बेफिकीरीचा आरोप.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण गांवातील ‘महात्मा गांधी विद्यालय’ शिक्षक नियुक्ती साठी ग्रामस्थ आणि पालकांनी पाच दिवस आंदोलन करूनही शिक्षण विभागाकडून शिक्षक दिलाच गेला नाही. सबब विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार असा सवाल करत तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षण अधिकारी श्री माने हे नुसती बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप करत काल ३० जूनला संतप्त ग्रामस्थ व हतबल पालकांनी अखेर शाळेला टाळे ठोकले.

या शाळेत एकुण ५ शिक्षकांपैकी ४ शिक्षक आहेत. यापैकी एक रजेवर तर नविन आलेले अमित पवार यांना मुख्याध्यापकांना मोबाईलवर आलेल्या फक्त एका संदेशावरुन मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिवराम परब यांना कल्पनाही न देता, शिक्षक अमित पवार यांना कामगिरीवर जाण्यास कार्यमुक्त केले. प्रत्यक्ष ७ वर्ग व दोन महिला शिक्षक…! यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची विचारणा केली असता तालुका किंवा जिल्हा पातळीवरुन उत्तरे देण्यास टाळाटाळ होत आहे. श्रावण शाळेचे कायमस्वरूपी शिक्षक अमित पवार हे कामगिरी म्हणुन दुसऱ्या शाळेत पाठविले, याबाबत सर्व पालकांनी आंदोलन करून सोमवारी २६ जून पासून मुलांना शाळेत पाठवले नाही. याबाबत ५ दिवस होऊनही केंद्र प्रमुख देऊ जंगले यांच्या कडून कोणतीही दखल घेतली जात नाही नसून केंद्र प्रमुख याला जबाबदार आहेत असे आलोप शाळा समिती अध्यक्ष व पालक करत आहेत. एकंदरीत श्रावण शाळेला कोणीच वाली नसल्याने काल ३० जूनला ग्रामस्थ व पालकांनी शाळेला टाळे लावून आंदोलन तीव्र केले आहे.

शिक्षण विभागाने लवकरच प्रशासनाशी चर्चा करुन यावर तोडगा काढत शिक्षक अमित पवार यांना मुळ शाळेवर हजर करावे अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन, सोमवार पासुन पंचायत समिती मालवण कार्यालयातच शाळा भरवणार असा इशारा श्रावण शाळेचे अध्यक्ष शिवराम परब, पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्रावणातील शाळेला टाळे ; संतप्त ग्रामस्थ व पालकांनी शिक्षण विभागावर केला बेफिकीरीचा आरोप.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण गांवातील 'महात्मा गांधी विद्यालय' शिक्षक नियुक्ती साठी ग्रामस्थ आणि पालकांनी पाच दिवस आंदोलन करूनही शिक्षण विभागाकडून शिक्षक दिलाच गेला नाही. सबब विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार असा सवाल करत तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षण अधिकारी श्री माने हे नुसती बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप करत काल ३० जूनला संतप्त ग्रामस्थ व हतबल पालकांनी अखेर शाळेला टाळे ठोकले.

या शाळेत एकुण ५ शिक्षकांपैकी ४ शिक्षक आहेत. यापैकी एक रजेवर तर नविन आलेले अमित पवार यांना मुख्याध्यापकांना मोबाईलवर आलेल्या फक्त एका संदेशावरुन मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शिवराम परब यांना कल्पनाही न देता, शिक्षक अमित पवार यांना कामगिरीवर जाण्यास कार्यमुक्त केले. प्रत्यक्ष ७ वर्ग व दोन महिला शिक्षक…! यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची विचारणा केली असता तालुका किंवा जिल्हा पातळीवरुन उत्तरे देण्यास टाळाटाळ होत आहे. श्रावण शाळेचे कायमस्वरूपी शिक्षक अमित पवार हे कामगिरी म्हणुन दुसऱ्या शाळेत पाठविले, याबाबत सर्व पालकांनी आंदोलन करून सोमवारी २६ जून पासून मुलांना शाळेत पाठवले नाही. याबाबत ५ दिवस होऊनही केंद्र प्रमुख देऊ जंगले यांच्या कडून कोणतीही दखल घेतली जात नाही नसून केंद्र प्रमुख याला जबाबदार आहेत असे आलोप शाळा समिती अध्यक्ष व पालक करत आहेत. एकंदरीत श्रावण शाळेला कोणीच वाली नसल्याने काल ३० जूनला ग्रामस्थ व पालकांनी शाळेला टाळे लावून आंदोलन तीव्र केले आहे.

शिक्षण विभागाने लवकरच प्रशासनाशी चर्चा करुन यावर तोडगा काढत शिक्षक अमित पवार यांना मुळ शाळेवर हजर करावे अशी मागणी होत आहे. अन्यथा राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन, सोमवार पासुन पंचायत समिती मालवण कार्यालयातच शाळा भरवणार असा इशारा श्रावण शाळेचे अध्यक्ष शिवराम परब, पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.

error: Content is protected !!