27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी कालवश ; मराठी व हिंदी सिनेमात होते उल्लेखनीय योगदान.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : भारतीय सिनेमा सृष्टीतील नावाजलेले मराठी नांव आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. १९५७ ते १९७३ अशी १६ वर्षे त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीत उल्लेखनीय योगदान दिले होते.

अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. काल २९ जूनला दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेली कित्येक वर्षे त्या मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची वार्ता माध्यमांना दिली.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षांपासून त्या हिंदी सिनेमात काम करू लागल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या ‘मौसी’ या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाबरोबर ‘गुरू और चेला’, ‘चिराग’, ‘फरिश्ता’, ‘श्रीमानजी’, ‘दिल और मोहब्बत’, ‘अलबेला मस्ताना’ अशा विविध हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले. मराठीतही ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मानला तर देव’ सारख्या चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : भारतीय सिनेमा सृष्टीतील नावाजलेले मराठी नांव आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. १९५७ ते १९७३ अशी १६ वर्षे त्यांनी मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीत उल्लेखनीय योगदान दिले होते.

अभिनेते सुनील दत्त, किशोर कुमार, आशा पारेख, शर्मिला टागोर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते. काल २९ जूनला दक्षिण मुंबईतील त्यांच्या घरी त्यांचे निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या. गेली कित्येक वर्षे त्या मूत्रिपडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची वार्ता माध्यमांना दिली.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या आशा नाडकर्णी १९५७ मध्ये आपल्या कुटुंबासह मुंबईत स्थायिक झाल्या. मुंबईत आल्यानंतर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षांपासून त्या हिंदी सिनेमात काम करू लागल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या ‘मौसी’ या चित्रपटात पहिली संधी दिली होती. व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाबरोबर ‘गुरू और चेला’, ‘चिराग’, ‘फरिश्ता’, ‘श्रीमानजी’, ‘दिल और मोहब्बत’, ‘अलबेला मस्ताना’ अशा विविध हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केले. मराठीतही ‘श्रीमान बाळासाहेब’, ‘क्षण आला भाग्याचा’, ‘मानला तर देव’ सारख्या चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.

error: Content is protected !!