मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळा व्यवस्थापन समिती देऊळवाड यांच्या सहकार्याने प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी डाॅ. वीणा मेहेंदळे, आरोग्यसेवक श्री. सावजी, सौ. रसाळ मॅडम, आशा स्वयंसेवक सौ. अंकिता मेस्त्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. कदम यांनी आरोग्य केंद्राच्या वतीने सहकार्य केले. यावेळी ‘पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी’ या विषयावर डॉ. मेहेंदळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. आरोग्यसेवक श्री. सावजी यांनी पावसाळ्यात पसरणारे साथीचे रोग याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व मुलांचा रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासण्यात आले. त्याबाबत मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, उपाध्यक्ष सौ. लाकम, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर व शिक्षक वर्ग यांनी नियोजन केले.