कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण गांवातील ग्रामस्थ व जि.प.शालेय पालकांनी जो पर्यंत शाळेत शिक्षक संख्या पूर्ण होत नाही तो पर्यंत शाळेत आमची मुले पाठवणार नाही असा ठाम निर्णय घेत महात्मा गांधी विद्यालय श्रावण नं. १ या शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना थांबऊन ठिय्या आंदोलन करत जिल्हा व तालुका शिक्षण विभागाच्या नावाने घोषणाबाजी केली होती. या आंदोलनाला ४ दिवस उलटूनही अजून शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.
श्रावण शाळेची शिक्षक संख्या ५ होती. जिल्हा शिक्षक बदली वेळी ५ शिक्षकां मधून शिक्षण विभागाने ३ शिक्षकांची बदली केली. त्या तीन शिक्षकांपैकी दोनच शिक्षक त्या जागेवर दिलेत. एक शिक्षक भरलाच नाही. उलट या २ नविन शिक्षकांपैकी एक उपशिक्षक अमित पवार नावाचे शिक्षक कामगिरी म्हणुन दुसर्या शाळेवर पाठवले. पर्यायाने ५ शिक्षकांचे अध्यापन फक्त तीनच शिक्षक करत आहेत. यात शिक्षकांची कसरत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, शाळेचे सर्व पालक व ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन १६ जुन २०२३ रोजी गटशिक्षण अधिकारी यांना संबधित शिक्षकाची कामगिरी रध्द करावी असा अर्ज दिला होता . परंतु अर्ज केराच्या टोपलीत टाकून अर्जाचे अद्यापही लेखी उत्तर न देता, मुख्याद्यापकांना एक मोबाईल संदेश पाठवून त्या पवार शिक्षकांना कामगिरीवर कार्यमुक्त केले. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला काहीही माहिती नाही. नंतर ही माहिती मिळताच, व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामपंचायत यांनी, जो पर्यंत शाळेत कामगिरी शिक्षक परत येत नाही, तो पर्यंत शाळेत आमची मुले पाठवणार नाहीत. असा पक्का निर्णय श्रावण शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांना थांबवून पालकांनी केला. तसेच ठिय्या आंदोलन करत जिल्हा व तालुका शिक्षण विभागाच्या नावाने घोषणाबाजी केली.
याबाबत शिक्षण विभागाने ४ दिवस अजुनही काही पावले उचललेली नाहीत.याची वरीष्ठांनी लगेच दखल घ्यावी व ग्रामीण भागातील या गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान थांबवावे असे संतप्त आवाहन व नाराजी श्रावण गांवातील ग्रामस्थ व जि प शाळेच्या पालक वर्गातून होत आहे.