24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वेरली गांवचे सुपुत्र व मुंबई भाजपाच्या मालाड मतदार संघाचे महामंत्री सुरेश मापारी यांच्या वतीने शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

- Advertisement -
- Advertisement -

सुरेश मापारी हे भारतीय जनता पक्षाचे भूषण आहेत अशी भाजपा तर्फे प्रशंसा.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वेरली गांवचे सुपुत्र आणि मुंबई मालाड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सुरेश मापारी यांच्या माध्यमातून मालाड मुंबई येथे गरीब गरजवंत शेकडो विद्यार्थ्यांना मालाडच्या भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ३५ येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेली अनेक वर्ष सुरेश मापारी हे मुंबई येथे गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि वेळोवेळी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावा अंतर्गत स्वखर्चाने मदत करत आहेत. लॉकडाऊनच्या खडतर काळातही सुरेश मापारी यांनी गरीब गरजूंना स्वखर्चाने अन्नधान्य वाटप नाश्ता व जेवण देण्याचाही उपक्रम त्यांनी केला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध ठिकाणी सुरेश मापारी यांनी दरवर्षी गरीब गरजवंतांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत. यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष उत्तर मुंबई गणेश खणकर, जिल्हा पदाधिकारी नरेंद्र राठोड, जिल्हा पदाधिकारी सुरेश रावलजी, संकल्प शर्माजी, दीप्ती बेन, अलका कांबळे, ज्योती वाजपेयी व भारतीय जनता पक्षाचे विविध सेलचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गणेश खणकर यांनी विशेष प्रशंसा करत म्हणाले की सुरेश मापारी यांचा शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून सुरेश मापारी यांसारखे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने या भागाचे भूषण आहेत. सूत्रसंचालन आणि आभार सुरेश मापारी यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुरेश मापारी हे भारतीय जनता पक्षाचे भूषण आहेत अशी भाजपा तर्फे प्रशंसा.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वेरली गांवचे सुपुत्र आणि मुंबई मालाड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सुरेश मापारी यांच्या माध्यमातून मालाड मुंबई येथे गरीब गरजवंत शेकडो विद्यार्थ्यांना मालाडच्या भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ३५ येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेली अनेक वर्ष सुरेश मापारी हे मुंबई येथे गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि वेळोवेळी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठावा अंतर्गत स्वखर्चाने मदत करत आहेत. लॉकडाऊनच्या खडतर काळातही सुरेश मापारी यांनी गरीब गरजूंना स्वखर्चाने अन्नधान्य वाटप नाश्ता व जेवण देण्याचाही उपक्रम त्यांनी केला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही विविध ठिकाणी सुरेश मापारी यांनी दरवर्षी गरीब गरजवंतांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत. यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष उत्तर मुंबई गणेश खणकर, जिल्हा पदाधिकारी नरेंद्र राठोड, जिल्हा पदाधिकारी सुरेश रावलजी, संकल्प शर्माजी, दीप्ती बेन, अलका कांबळे, ज्योती वाजपेयी व भारतीय जनता पक्षाचे विविध सेलचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गणेश खणकर यांनी विशेष प्रशंसा करत म्हणाले की सुरेश मापारी यांचा शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून सुरेश मापारी यांसारखे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने या भागाचे भूषण आहेत. सूत्रसंचालन आणि आभार सुरेश मापारी यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!