मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात उद्या १८ जूनला ‘मोदी @9’ अंतर्गत व्यापारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हाॅटेल चिवला बीच येथे संध्याकाळी ४:३० वाजता या संमेलनाचा आरंभ होत असून माजी खासदार व भाजपा नेते तसेच मालवण कुडाळ विधानसभा संयोजक डाॅ निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन संपन्न होणार आहे.
या व्यापारी संमेलनाला निर्मल सुराना ( माजी आमदार कर्नाटक राज्य ), अतुल काळसेकर ( उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र), माजी आमदार प्रमोद जठार(लोकसभा संयोजक), दता सामंत (प्रदेश कार्यकारणी सदस्य), प्रभाकर सावंत ( जिल्हा संघटन सरचिटणीस),
अशोक सावंत (जिल्हा सरचिटणीस) हे प्रमुख मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
मान्यवरांमार्फत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षांमध्ये वाणिज्य क्षेत्रासाठी केलेल्या कामांची व्यापारी बांधवांना माहिती देणे व व्यापारी बांधवांची संवाद साधणे हा या संमेलनाचा हेतू आहे . या अनोख्या व्यापारी संमेलनाला सर्व व्यापारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व निमंत्रण श्री. विजय केनवडेकर (जिल्हाध्यक्ष व्यापार आघाडी भाजपा) आणि श्री.धोंडी चिंदरकर (तालुकाध्यक्ष भाजपा) यांनी केले आहे.