27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पत्रकारितेतील ‘द वाॅल’ …अर्थात् विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर. ( वाढदिवस विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

सुयोग पंडित | मुख्य संपादक : ‘द वाॅल ‘ म्हणल्या नंतर आपल्या मनात राहुल द्रविड हे नांव डोळ्यांसमोर येते. आता ते नांव क्रिकेट मधील तंत्रशुद्धता, परिपक्वता आणि परिणामकारीतेसाठी जितके आपण मानत असतो तितकेच ते नांव आधुनीकता, सुसंस्कृत पणा आणि स्वतःसोबत इतरांनाही घडवत जाण्यासाठी अक्षरशः पूजनीय असेच आहे हे अख्खे जग जाणते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात सुद्धा एक ‘ द वाॅल ‘ स्वतःच्या मेहनतीने आणि वरील सर्व गुणांसह ‘ स्ट्रीट स्मार्ट ‘ पद्धतीने सक्षमपणे उभी रहात गेलेली आहे हे लक्षात येईल . सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री. विद्याधर प्रतापराव उर्फ बंटी केनवडेकर असे त्या ‘ द वाॅल ‘ चे नांव आहे.

मिलिनियम म्हणजे साल २००० च्या आधीपासून आजपर्यंत विद्याधर केनवडेकर पत्रकारितेत अखंड कार्यरत आहेत. या दरम्यान आजपर्यंत ते ‘तंत्रशुद्ध’ पत्रकारितेतच कार्यरत आहेत हे महत्वाचे आहे. या दरम्यान त्यांच्यासोबत असंख्य पत्रकारांची फळीसुद्धा मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होत गेली…काहीजण त्यांच्या कडे बघत शिकत गेली तर काही स्वयंभू परंतु या दरम्यान विद्याधर केनवडेकर जसे आहेत तसेच राहीलेत…अभेद्य..! केनवडेकर परिवार त्यांच्या मतांबाबत सुसंस्कृत स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो. परंतु पत्रकारितेत या स्पष्टवक्तेपणाला तटस्थतेसोबत जपून साधेपणाने सर्वांना जोडत जायचे एक अजब कौशल्य बंटी केनवडेकर यांच्याकडे आहे. समाजातील घडामोडींविषयी जेवढी तळमळ किंवा कर्तव्य म्हणून ते जगतात तेवढेच आपल्या सहकारी पत्रकार बंधु भगिनींसाठी ‘शाश्वत’ असे काहीतरी निर्माण व्हावे हे व्रत घेतलेला देखील तो एक ‘पत्र तपस्वी’ आहे असे म्हणणे वावगं ठरणार नाही. तळागाळातील पत्रकारांना तशा कुठल्याही ‘पॅकेज सुविधा’ उपलब्ध नसतात आणि म्हणूनच जिल्ह्यातील पत्रकार हा अखंड पत्रकार म्हणून जगत रहाण्यासाठी त्याचे कुटुंब हे सुखी रहावे ही नाडी अचूक जाणलेल्या व्यक्तिंपैकी एक अनुभवी व्यक्ती विद्याधर केनवडेकर आहेत आणि परिणामी ते सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत…आणि अध्यक्ष श्री.उमेश तोरसकर व इतर कार्यकारिणीसह ते जिल्हा पत्रकार संघातील प्रत्येक सदस्याला एक ‘खंबीर ‘ कणा बनून सामाजिक बांधिलकी जगत पत्रकाराला त्याच्या परिवारासह एका सकारात्मक नवीन आकाशाकडे नेऊ पहात आहेत ज्या आकाशात पत्रकारितेची गुणवत्ता सुद्धा सरस्वतीच्या पवित्रपणे अबाधीत असेल आणि कौटुंबिक उदर निर्वाहनिधीची आवश्यक लक्ष्मी सुद्धा सुरक्षितपणे नांदत राहील.
वरील वर्णन त्यांनाच अतिशयोक्ती वाटेल ज्यांनी तटस्थपणे जग पाहिले नसेल.

अतिशय कमी वयात पत्रकरितेत आल्यानंतर ‘कै.नरेंद्र परब’ नांवाच्या दीपगृहाची सुसंस्कृत जागा भरुन काढणे ही एक नुसतीच जबाबदारी नसते तर त्या जागेवर आणखीन एका दीपगृहाची उभारणी करणे हे एक कार्य विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर यांनी नकळतपणे केले आहे. बंटी केनवडेकर हे प्रसंगी एखाद्या गोष्टीसाठी रागावतील..आग्रही असतील…प्रसंगी बोलणे टाळतील पण ते कधी ‘नाराज’ होऊन कोणाकडे दुर्लक्ष करत नाहीत. आपला मुद्दा कळकळीने पोचवण्यासाठी ते लाचार नसतात तर तो मुद्दा हाच कसा योग्य उद्देशात्मक आहे यासाठी त्यांच्या त्या पटवून द्यायच्या परखड पण सुसंस्कृत पद्धती आहेत. त्यांचे वडिल कै. प्रतापराव केनवडेकर यांच्या ‘सर्वसमावेशक’ गुणाची १००% झलक त्यांच्यात पहायला मिळते. बाल आणि युवा वयात भरपूर वाचन केलेले असल्याने ज्ञान व सज्ञान या दोन्हीत त्यांचे कुठेच अडत नाही. युवा वयात माहिती तंत्रज्ञान याचे परिपक्व प्रशिक्षण घेतल्यामुळे आज ते एका संगणक प्रशिक्षण केंद्राचे यशस्वी संचालक देखील आहेत. हे सगळं असूनही बंटी केनवडेकर धसमुसळेपणाने कुठेतरी अनियंत्रित घाई करत धावताना तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्यांच्या ‘द वाॅल ‘ ची एकेक वीट अतिशय ‘ओळंब्यात’ रचतं रचत ते उभे राहिलेत त्यामुळे ती सक्षम साधेपणाची डिग्निटी ते ढळू देत नाहीत. विनोदाची उत्तम जाण असून देखील ते उगीचच मोठमोठ्याने वायफळ हसताना तुम्हाला दिसणार नाहीत. वडिल गेल्यानंतर काही माणसे कोसळतात परंतु २८ ऑगस्ट २००२ नंतरचे बंटी केनवडेकर हे आणखीन समाजशील व क्रियाशील होत गेले हे वास्तव आहे.

अखेरीस एक आठवण नक्की आहे ती साल २००१ सालची. दै.तरुण भारतचे एक खूप मोठं नांव म्हणजे श्री. बालमुकुंद पत्की. २००१ साली एक कार्यक्रम कव्हर करायला ते स्वतः येणार होते परंतु काही कारणाने ते येऊ शकले नव्हते पण त्यांनी फोनवर माझ्या एका निकटवर्तीयाला सांगितले होते की ,” मला काळजी नाही…बंटी आहे तिथे …तो नीट कव्हर करेल..!” इतका ‘पत्रविश्वास’ त्यांनी त्या अल्पवयातच कमवला होता ज्या कमाईची आज एक ‘अनुभव बॅन्क’ झाली आहे. विजय शेट्टी, प्रफुल्ल देसाई, कै.नरेंद्र परब वगैरेंचा तत्कालीन परिसस्पर्श लाभलेले विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर आज स्वतः एक परिस झालेत ज्यांच्या स्पर्शाने मनोज चव्हाण यांच्या सारखे सुवर्णरत्न सुद्धा जडत गेले…आणि खूप नावं आहेत…काहीजण त्यांचे ‘एकलव्य’ देखिल आहेत.

आज जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर यांचा वाढदिवस. त्यांचे हे ‘द वाॅल ‘ अभेद्य राहो व आणखीन सक्षम होत जावो याच संपूर्ण आपली सिंधुनगरी चॅनेल समूहातर्फे सदिच्छा.

(आपली सिंधुनगरी चॅनेल समूह)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुयोग पंडित | मुख्य संपादक : 'द वाॅल ' म्हणल्या नंतर आपल्या मनात राहुल द्रविड हे नांव डोळ्यांसमोर येते. आता ते नांव क्रिकेट मधील तंत्रशुद्धता, परिपक्वता आणि परिणामकारीतेसाठी जितके आपण मानत असतो तितकेच ते नांव आधुनीकता, सुसंस्कृत पणा आणि स्वतःसोबत इतरांनाही घडवत जाण्यासाठी अक्षरशः पूजनीय असेच आहे हे अख्खे जग जाणते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात सुद्धा एक ' द वाॅल ' स्वतःच्या मेहनतीने आणि वरील सर्व गुणांसह ' स्ट्रीट स्मार्ट ' पद्धतीने सक्षमपणे उभी रहात गेलेली आहे हे लक्षात येईल . सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री. विद्याधर प्रतापराव उर्फ बंटी केनवडेकर असे त्या ' द वाॅल ' चे नांव आहे.

मिलिनियम म्हणजे साल २००० च्या आधीपासून आजपर्यंत विद्याधर केनवडेकर पत्रकारितेत अखंड कार्यरत आहेत. या दरम्यान आजपर्यंत ते 'तंत्रशुद्ध' पत्रकारितेतच कार्यरत आहेत हे महत्वाचे आहे. या दरम्यान त्यांच्यासोबत असंख्य पत्रकारांची फळीसुद्धा मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होत गेली…काहीजण त्यांच्या कडे बघत शिकत गेली तर काही स्वयंभू परंतु या दरम्यान विद्याधर केनवडेकर जसे आहेत तसेच राहीलेत…अभेद्य..! केनवडेकर परिवार त्यांच्या मतांबाबत सुसंस्कृत स्पष्टवक्ता म्हणून ओळखला जातो. परंतु पत्रकारितेत या स्पष्टवक्तेपणाला तटस्थतेसोबत जपून साधेपणाने सर्वांना जोडत जायचे एक अजब कौशल्य बंटी केनवडेकर यांच्याकडे आहे. समाजातील घडामोडींविषयी जेवढी तळमळ किंवा कर्तव्य म्हणून ते जगतात तेवढेच आपल्या सहकारी पत्रकार बंधु भगिनींसाठी 'शाश्वत' असे काहीतरी निर्माण व्हावे हे व्रत घेतलेला देखील तो एक 'पत्र तपस्वी' आहे असे म्हणणे वावगं ठरणार नाही. तळागाळातील पत्रकारांना तशा कुठल्याही 'पॅकेज सुविधा' उपलब्ध नसतात आणि म्हणूनच जिल्ह्यातील पत्रकार हा अखंड पत्रकार म्हणून जगत रहाण्यासाठी त्याचे कुटुंब हे सुखी रहावे ही नाडी अचूक जाणलेल्या व्यक्तिंपैकी एक अनुभवी व्यक्ती विद्याधर केनवडेकर आहेत आणि परिणामी ते सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत…आणि अध्यक्ष श्री.उमेश तोरसकर व इतर कार्यकारिणीसह ते जिल्हा पत्रकार संघातील प्रत्येक सदस्याला एक 'खंबीर ' कणा बनून सामाजिक बांधिलकी जगत पत्रकाराला त्याच्या परिवारासह एका सकारात्मक नवीन आकाशाकडे नेऊ पहात आहेत ज्या आकाशात पत्रकारितेची गुणवत्ता सुद्धा सरस्वतीच्या पवित्रपणे अबाधीत असेल आणि कौटुंबिक उदर निर्वाहनिधीची आवश्यक लक्ष्मी सुद्धा सुरक्षितपणे नांदत राहील.
वरील वर्णन त्यांनाच अतिशयोक्ती वाटेल ज्यांनी तटस्थपणे जग पाहिले नसेल.

अतिशय कमी वयात पत्रकरितेत आल्यानंतर 'कै.नरेंद्र परब' नांवाच्या दीपगृहाची सुसंस्कृत जागा भरुन काढणे ही एक नुसतीच जबाबदारी नसते तर त्या जागेवर आणखीन एका दीपगृहाची उभारणी करणे हे एक कार्य विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर यांनी नकळतपणे केले आहे. बंटी केनवडेकर हे प्रसंगी एखाद्या गोष्टीसाठी रागावतील..आग्रही असतील…प्रसंगी बोलणे टाळतील पण ते कधी 'नाराज' होऊन कोणाकडे दुर्लक्ष करत नाहीत. आपला मुद्दा कळकळीने पोचवण्यासाठी ते लाचार नसतात तर तो मुद्दा हाच कसा योग्य उद्देशात्मक आहे यासाठी त्यांच्या त्या पटवून द्यायच्या परखड पण सुसंस्कृत पद्धती आहेत. त्यांचे वडिल कै. प्रतापराव केनवडेकर यांच्या 'सर्वसमावेशक' गुणाची १००% झलक त्यांच्यात पहायला मिळते. बाल आणि युवा वयात भरपूर वाचन केलेले असल्याने ज्ञान व सज्ञान या दोन्हीत त्यांचे कुठेच अडत नाही. युवा वयात माहिती तंत्रज्ञान याचे परिपक्व प्रशिक्षण घेतल्यामुळे आज ते एका संगणक प्रशिक्षण केंद्राचे यशस्वी संचालक देखील आहेत. हे सगळं असूनही बंटी केनवडेकर धसमुसळेपणाने कुठेतरी अनियंत्रित घाई करत धावताना तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्यांच्या 'द वाॅल ' ची एकेक वीट अतिशय 'ओळंब्यात' रचतं रचत ते उभे राहिलेत त्यामुळे ती सक्षम साधेपणाची डिग्निटी ते ढळू देत नाहीत. विनोदाची उत्तम जाण असून देखील ते उगीचच मोठमोठ्याने वायफळ हसताना तुम्हाला दिसणार नाहीत. वडिल गेल्यानंतर काही माणसे कोसळतात परंतु २८ ऑगस्ट २००२ नंतरचे बंटी केनवडेकर हे आणखीन समाजशील व क्रियाशील होत गेले हे वास्तव आहे.

अखेरीस एक आठवण नक्की आहे ती साल २००१ सालची. दै.तरुण भारतचे एक खूप मोठं नांव म्हणजे श्री. बालमुकुंद पत्की. २००१ साली एक कार्यक्रम कव्हर करायला ते स्वतः येणार होते परंतु काही कारणाने ते येऊ शकले नव्हते पण त्यांनी फोनवर माझ्या एका निकटवर्तीयाला सांगितले होते की ," मला काळजी नाही…बंटी आहे तिथे …तो नीट कव्हर करेल..!" इतका 'पत्रविश्वास' त्यांनी त्या अल्पवयातच कमवला होता ज्या कमाईची आज एक 'अनुभव बॅन्क' झाली आहे. विजय शेट्टी, प्रफुल्ल देसाई, कै.नरेंद्र परब वगैरेंचा तत्कालीन परिसस्पर्श लाभलेले विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर आज स्वतः एक परिस झालेत ज्यांच्या स्पर्शाने मनोज चव्हाण यांच्या सारखे सुवर्णरत्न सुद्धा जडत गेले…आणि खूप नावं आहेत…काहीजण त्यांचे 'एकलव्य' देखिल आहेत.

आज जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री विद्याधर उर्फ बंटी केनवडेकर यांचा वाढदिवस. त्यांचे हे 'द वाॅल ' अभेद्य राहो व आणखीन सक्षम होत जावो याच संपूर्ण आपली सिंधुनगरी चॅनेल समूहातर्फे सदिच्छा.

(आपली सिंधुनगरी चॅनेल समूह)

error: Content is protected !!