25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बंड्या खोत मित्रमंडळाच्या मदतीने आदिवासी भारावले!

- Advertisement -
- Advertisement -

दुर्गम भागातील कातकरी वस्ती व इतर गरजू ग्रामस्थांना ७०० पॅकेट गृहपयोगी साहित्य वाटप

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील ‘बंड्या खोत मित्र मंडळाच्या वतीने’ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील आदिवासी पाड्यावरील सुमारे पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. सापीर्ले मधलीवाडी, कातरकरवाडी, रामवाडी, देऊळवाडी, भराडवाडी, बौद्धवाडी, सीमेचीवाडी, रामवाडी आदी वाड्यावर जात ही मदत बंड्या खोत यांनी सहकाऱ्यांच्या साथीने वितरित केली. मंडळ अधिकारी राजाराम घुले, तलाठी सुदिल कांबळे यांनी यावेळी दिवसभर अन्नधान्य किट वाटप करताना उपस्थित राहत सहकार्य केले.
सदर भागात कुणाचीही मदत पोहोचली नव्हती. गावात पोहोचणाऱ्या मार्गावरील पूल अर्धवट खचले आहेत. तरी पण खऱ्या गरजवंतांना मदत पोहोचावी या हेतूने या खचलेल्या पुलावरून गाडी नेत जीवनावश्यक साहित्य कातकरी ग्रामस्थां सह इतर वाड्यातील रहिवाश्यांना पोहोच करण्यात आल्याची माहिती बंड्या खोत यांनी दिली. शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा गरजवंतांना मदत पोहोच केल्याबद्दल बंड्या खोत मित्र मंडळाचे आभार मानले.रस्त्या अभावी अनेक कुटुंबांना स्थानिकांच्या मोटारसायकल घेत बंड्या खोत यांनी मदत पोहोच केली. अन्नधान्या सह कपडे व इतर साहित्याचे सुमारे सातशे किट तोंडवळी येथील श्री वाघेश्वर देवालयात बनविण्यात आले. चिपळूण तसेच खेड येथील अनेक पूरग्रस्त भागात अद्याप मदत पोहोचली नाही आहे. ग्रामस्थ अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे दात्यांनी, अथवा मंडळांनी मदत देताना खरोखरच ज्यांना आवश्यकता आहे अशाच लोकांना मदत पोहोच करण्याचे आवाहन बंड्या खोत यांनी केले आहे. मदत केलेल्या सर्वांचे बंड्या खोत यांनी आभार मानले आहेत. चिपळूण येथे बंड्या खोत यांच्या सह ज्ञानेश गोलतकर, मयूर वायंगणकर, दिनेश कांबळी आदी मदत वाटपात सहभागी झाले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

दुर्गम भागातील कातकरी वस्ती व इतर गरजू ग्रामस्थांना ७०० पॅकेट गृहपयोगी साहित्य वाटप

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील 'बंड्या खोत मित्र मंडळाच्या वतीने' रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड येथील आदिवासी पाड्यावरील सुमारे पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले. सापीर्ले मधलीवाडी, कातरकरवाडी, रामवाडी, देऊळवाडी, भराडवाडी, बौद्धवाडी, सीमेचीवाडी, रामवाडी आदी वाड्यावर जात ही मदत बंड्या खोत यांनी सहकाऱ्यांच्या साथीने वितरित केली. मंडळ अधिकारी राजाराम घुले, तलाठी सुदिल कांबळे यांनी यावेळी दिवसभर अन्नधान्य किट वाटप करताना उपस्थित राहत सहकार्य केले.
सदर भागात कुणाचीही मदत पोहोचली नव्हती. गावात पोहोचणाऱ्या मार्गावरील पूल अर्धवट खचले आहेत. तरी पण खऱ्या गरजवंतांना मदत पोहोचावी या हेतूने या खचलेल्या पुलावरून गाडी नेत जीवनावश्यक साहित्य कातकरी ग्रामस्थां सह इतर वाड्यातील रहिवाश्यांना पोहोच करण्यात आल्याची माहिती बंड्या खोत यांनी दिली. शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा गरजवंतांना मदत पोहोच केल्याबद्दल बंड्या खोत मित्र मंडळाचे आभार मानले.रस्त्या अभावी अनेक कुटुंबांना स्थानिकांच्या मोटारसायकल घेत बंड्या खोत यांनी मदत पोहोच केली. अन्नधान्या सह कपडे व इतर साहित्याचे सुमारे सातशे किट तोंडवळी येथील श्री वाघेश्वर देवालयात बनविण्यात आले. चिपळूण तसेच खेड येथील अनेक पूरग्रस्त भागात अद्याप मदत पोहोचली नाही आहे. ग्रामस्थ अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे दात्यांनी, अथवा मंडळांनी मदत देताना खरोखरच ज्यांना आवश्यकता आहे अशाच लोकांना मदत पोहोच करण्याचे आवाहन बंड्या खोत यांनी केले आहे. मदत केलेल्या सर्वांचे बंड्या खोत यांनी आभार मानले आहेत. चिपळूण येथे बंड्या खोत यांच्या सह ज्ञानेश गोलतकर, मयूर वायंगणकर, दिनेश कांबळी आदी मदत वाटपात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!