बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाफोली ग्रामपंचायत सभागृहात इयत्ता १० वी व १२ तील सावंतांचे सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. नुकताच दहावी व बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी चांगले शैक्षणिक यश संपादन केले आहे. हा गावाचा अभिमान आहे. आत्ताचे विद्यार्थी उद्याचा गांव विकसित करणारे भविष्यातील पिढी आहे अशा शब्दांत शैक्षणिक वाटचालीसाठी गांवच्या वतीने या विद्यार्थांना सरपंच उमेश शिरोडकर व उपसरपंच विनेश गवस यांनी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थांनी पुढील जीवनात आवडीचे करियर करण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधावी. वाफोली गावातील चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही लाल मातीतील रत्ने आहेत. भविष्यात चांगले करिअर करीत असताना हुरहुरून न जाता यशाचे सातत्य टिकविले पाहिजे असा मोलाचा सल्ला व मार्गदर्शन श्री कांतीलाल वळवी(विस्तार अधिकारी पंचायत समिती) यांनी केले तसेच वाफोली गावातील दहावी,व बारावी परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वळवी यांनी केले.
गुणवंत विद्यार्थी वेदिका खानोलकर, मानसी देसाई, योग गवस, रमेश गवस, अवंती गवस, हर्षद गवस, गीता गवस, क्षितिजा सावंत, मितेश आईर, किरण परब,दत्ताराम परब, मयंक आईर, इशिता सावळ, विवेक ठाकूर, नलिनी घोगळे, आस्था वझरकर, जीवन पाटील, रुची सावंत या विद्यार्थांचा गुलाब पुष्प, सन्मान चिन्ह व सुपारीचे रोप देत सरपंच,उपसरपंच व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस,ग्रामपंचायत सदस्य मंथन गवस, साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे,स्नेहा आईर, पोलीस पाटील आना गवस, प्रमुख पाहुणे प्रा.देसाई सर, सौ अदिती पिळणकर,सौ.
समिधा आमडोसकर असे मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी, डाटा ऑपरेटर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले आणि विनेश गवस यांनी सर्वांचे आभार मानले.