26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख पदी माजी आमदार प्रमोद जठार ; भाजपची २०२४ लोकसभा निवडणुकीच्या ‘टेस्ट चॅम्पियनशिपची’ जय्यत तयारी.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुख पदी माजी खासदार डाॅ. निलेश राणे..!

नवलराज काळे | सहसंपादक : भारतीय जनता पक्षाकडून २०२४ लोकसभा निवडणुकीच्या ‘टेस्ट चॅम्पियनशिपची’ जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रवास योजनेच्या माध्यमातून भाजपकडून काम सुरू असतानाच आता लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी माजी आमदार प्रमोद जठार हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

तसेच तिन्ही विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार डाॅ.निलेश राणे, सावंतवाडीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तर कणकवलीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुख पदी माजी खासदार डाॅ. निलेश राणे..!

नवलराज काळे | सहसंपादक : भारतीय जनता पक्षाकडून २०२४ लोकसभा निवडणुकीच्या 'टेस्ट चॅम्पियनशिपची' जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रवास योजनेच्या माध्यमातून भाजपकडून काम सुरू असतानाच आता लोकसभेसाठी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी माजी आमदार प्रमोद जठार हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

तसेच तिन्ही विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार डाॅ.निलेश राणे, सावंतवाडीसाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली तर कणकवलीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे.

error: Content is protected !!