24.4 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

छोट्या दगडावर साकारला “शिवराज्याभिषेक” सोहळा!

- Advertisement -
- Advertisement -

कलाशिक्षक समीर चांदरकर यांची कलाकृती

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर

न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दीन म्हणून साजरा केला जातो.स्वराज्याची राजधानी रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचे २५ सेमी १२ सेमी आकाराचे हाताने दगडावर सर्वात लहान चित्र रेखाटले आहे ते वराडकर हायस्कुल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी!
दगडाचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे चित्र रंगवताना चांदरकर याना अनेक अडचणी आल्या. हे चित्र रंगवण्यासाठी ऍक्रेलिक कलरचा वापर त्यांनी केला. चित्र पूर्ण करण्यासाठी जवळपास चार ते पाच तासांचा कालावधी लागला. चित्रातले बारकावे दाखवण्यासाठी ०० नंबरच्या ब्रशचा वापर केला. संपूर्ण जगभर आज ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा होत असताना समीर चांदरकर यांच्या दगडावर साकारलेल्या या कलाकृतीचे शिवप्रेमी जनतेमधून कौतुक होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

  1. अप्रतिम कलाकृती. अभिनंदन सर.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कलाशिक्षक समीर चांदरकर यांची कलाकृती

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर

न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दीन म्हणून साजरा केला जातो.स्वराज्याची राजधानी रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेकाचे २५ सेमी १२ सेमी आकाराचे हाताने दगडावर सर्वात लहान चित्र रेखाटले आहे ते वराडकर हायस्कुल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी!
दगडाचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे चित्र रंगवताना चांदरकर याना अनेक अडचणी आल्या. हे चित्र रंगवण्यासाठी ऍक्रेलिक कलरचा वापर त्यांनी केला. चित्र पूर्ण करण्यासाठी जवळपास चार ते पाच तासांचा कालावधी लागला. चित्रातले बारकावे दाखवण्यासाठी ०० नंबरच्या ब्रशचा वापर केला. संपूर्ण जगभर आज ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा होत असताना समीर चांदरकर यांच्या दगडावर साकारलेल्या या कलाकृतीचे शिवप्रेमी जनतेमधून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!