29 C
Mālvan
Sunday, November 24, 2024
IMG-20240531-WA0007

लक्ष्मण तावडे कालवश ; चतुरस्त्र सामाजिक व्यक्तीमत्व हरपले.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटळ खांदारवाडी येथील लक्ष्मण वि. तावडे ( ८९ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने मालाड मुंबई येथे निधन झाले. सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे ते उपाध्यक्ष होते. तसेच सिंधुसागर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याच बरोबर त्यांनी मौजे नाटळ, खांदारवाडी-दुबळेश्वरवाडी शिक्षणोन्नती मंडळ ,मुंबई या संस्थेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. वृत्तपत्र लेखक म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबईचे सरचिटणीस व त्यानंतर सल्लागार तसेच राज्य शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालाड येथे बुधवारी रात्री अंतिम संस्कार करण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटळ खांदारवाडी येथील लक्ष्मण वि. तावडे ( ८९ वर्ष) यांचे वृद्धापकाळाने मालाड मुंबई येथे निधन झाले. सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित, मुंबईचे ते उपाध्यक्ष होते. तसेच सिंधुसागर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याच बरोबर त्यांनी मौजे नाटळ, खांदारवाडी-दुबळेश्वरवाडी शिक्षणोन्नती मंडळ ,मुंबई या संस्थेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. वृत्तपत्र लेखक म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबईचे सरचिटणीस व त्यानंतर सल्लागार तसेच राज्य शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालाड येथे बुधवारी रात्री अंतिम संस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!