29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आयपिएल २०२३ च्या ‘मॅरॅथॉन’ प्रमाणे रंगलेल्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या चेंडूवर मिळवला विजय ; पटकावले पाचवे जेतेपद.

- Advertisement -
- Advertisement -

कप्तान महेंद्र सिंग धोनीची मुंबई इंडियन्सच्या कप्तान रोहीत शर्माशी विजेतेपदांत बरोबरी.

गुजरात टायटन्सनच्या साई सुदर्शनची तुफान फटकेबाजी ठरला प्रशंसेचा विषय तर अंबाती रायुडूच्या समयोचित फटकेबाजीने त्याच्या कारकिर्दीची यशस्वी सांगता.

सुयोग पंडित | मुख्य संपादक : आयपिएल २०२३ ही ‘अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारी’ अशीच ओळखली जाईल आणि त्याचा प्रत्यय अंतिम सामन्यात देखील आला. पावसामुळे एक दिवस वाया गेल्याने राखीव दिवशी पुन्हा अंतिम सामन्यात पावसाचेच वर्चस्व असून देखील खेळाडू, प्रेक्षक आणि ग्राऊंडस्टाफच्या जबरदस्त चिकाटीने हा सामना संपन्न झाला. आयपीएलचा अंतिम सामना चांगलाच रंगला. गुजरातने चेन्नईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. पावसानंतर चेन्नईपुढे डकवर्थ लुईस नियमांनुसार १५ षटकांत १७१ धावांचे आव्हान आले होते.

गुजरातच्या २१५ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात पावसाचे आगमन झाले. त्यावेळी चेन्नईची बिन बाद ४ अशी अवस्था होती. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार १५ षटकांमध्ये १७१ धावांचे आ्हान देण्यात आले. मैदानात परतल्यावर ऋतुराज गायकवाडने चौकारासह गुजरातचे स्वागत केले. त्यानंतर ऋतुराज आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण पॉवर प्लेनंतर हे दोघेही बाद झाले. त्यानंतर अजिंक्य राहणे दमदार फलंदाजी करून बाद झाला. त्या नंतर आयपिएलचा शेवटचा सामना खेळणार्या अंबाती रायुडुने दोन षटकार व दोन चौकार ठोकत संघाला विजयासमीप नेले पण नंतर कप्तान महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण जडेजाने अखेरच्या दोन षटकांत १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

गुजरातला दुसऱ्याच षटकात मोठे जीवदान मिळाले. कारण तुषार देशपांडेच्या या दुसऱ्या षटकातच शुभमन गिलला जीवदान मिळाले, त्यावेळी तो तीन धावांवर होता. गेल्या सामन्यातही त्याला जीवदान मिळाले होते आणि त्याने शतक झळकावले होते. त्यामुळे गिल पुन्हा एकदा जीवदानाचा फायदा घेत शतक झळकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण त्याचवेळी धोनीने चाणाक्षपणे गिलला बाद केल्याचे पाहायला मिळाले. कारण पॉवर प्ले नंतरच्या पहिल्याच षटकात धोनीने रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले. जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने जलदगतीने यष्टीचीत केले आणि गिलला बाद केले. गिलला यावेळी ३९ धावा करता आल्या. गिल बाद झाल्यावर वृद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांच्यात दमदार भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. साहाने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. पण त्यानंतर तो जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहू शकला नाही. साहाने यावेळी ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावा केल्या. साहा बाद झाला तरी साई सुदर्शन मात्र चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत होता. त्याने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याच्या फटक्यांचा जोर वाढला आणि तो शतकाच्या जवळ आला. साई सुदर्शन आता शतक करणार असे वाटत होते. पण यावेळी फक्त चार धावा त्याला शतकासाठी कमी पडल्या. साई सुदर्शनने यावेळी ४७ चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ९६ धावांची दमदार खेळी साकारली. साई सुदर्शनच्या धमाकेदार फटकेबाजीच्या जोरावर गुजरातच्या संघाला २१४ धावांपर्यंत मजल मारता आली.

२५ चेंडूत ४७ धावा करणार्या डेव्हाॅन काॅनवेला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला तर सर्वाधीक बळी मिळवणारा गुजरात टायटन्सनचा मोहम्मद शामी पर्पल कॅपचा मानकरी ठरला. स्पर्धावीर ठरलेला शुभमन गील सर्वाधीक धावांसाठी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. स्पर्धेत सर्वात लांब ११५ मीटर दूर षटकार फाफ डुप्लसीसने मारला तर उदयोन्मुख खेळाडूचा मान यशस्वी जयस्वालला मिळाला.

अंतिम सामन्यानंतर बोलताना चेन्नईचा पाच वेळचा विजय यशस्वी कप्तान महेंद्र सिंग धोनीने पुढील आयपिएल मध्ये पुनश्च खेळण्याचे संकेत दिले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कप्तान महेंद्र सिंग धोनीची मुंबई इंडियन्सच्या कप्तान रोहीत शर्माशी विजेतेपदांत बरोबरी.

गुजरात टायटन्सनच्या साई सुदर्शनची तुफान फटकेबाजी ठरला प्रशंसेचा विषय तर अंबाती रायुडूच्या समयोचित फटकेबाजीने त्याच्या कारकिर्दीची यशस्वी सांगता.

सुयोग पंडित | मुख्य संपादक : आयपिएल २०२३ ही 'अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारी' अशीच ओळखली जाईल आणि त्याचा प्रत्यय अंतिम सामन्यात देखील आला. पावसामुळे एक दिवस वाया गेल्याने राखीव दिवशी पुन्हा अंतिम सामन्यात पावसाचेच वर्चस्व असून देखील खेळाडू, प्रेक्षक आणि ग्राऊंडस्टाफच्या जबरदस्त चिकाटीने हा सामना संपन्न झाला. आयपीएलचा अंतिम सामना चांगलाच रंगला. गुजरातने चेन्नईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. पावसानंतर चेन्नईपुढे डकवर्थ लुईस नियमांनुसार १५ षटकांत १७१ धावांचे आव्हान आले होते.

गुजरातच्या २१५ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात पावसाचे आगमन झाले. त्यावेळी चेन्नईची बिन बाद ४ अशी अवस्था होती. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार १५ षटकांमध्ये १७१ धावांचे आ्हान देण्यात आले. मैदानात परतल्यावर ऋतुराज गायकवाडने चौकारासह गुजरातचे स्वागत केले. त्यानंतर ऋतुराज आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण पॉवर प्लेनंतर हे दोघेही बाद झाले. त्यानंतर अजिंक्य राहणे दमदार फलंदाजी करून बाद झाला. त्या नंतर आयपिएलचा शेवटचा सामना खेळणार्या अंबाती रायुडुने दोन षटकार व दोन चौकार ठोकत संघाला विजयासमीप नेले पण नंतर कप्तान महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण जडेजाने अखेरच्या दोन षटकांत १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

गुजरातला दुसऱ्याच षटकात मोठे जीवदान मिळाले. कारण तुषार देशपांडेच्या या दुसऱ्या षटकातच शुभमन गिलला जीवदान मिळाले, त्यावेळी तो तीन धावांवर होता. गेल्या सामन्यातही त्याला जीवदान मिळाले होते आणि त्याने शतक झळकावले होते. त्यामुळे गिल पुन्हा एकदा जीवदानाचा फायदा घेत शतक झळकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण त्याचवेळी धोनीने चाणाक्षपणे गिलला बाद केल्याचे पाहायला मिळाले. कारण पॉवर प्ले नंतरच्या पहिल्याच षटकात धोनीने रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले. जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने जलदगतीने यष्टीचीत केले आणि गिलला बाद केले. गिलला यावेळी ३९ धावा करता आल्या. गिल बाद झाल्यावर वृद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांच्यात दमदार भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. साहाने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. पण त्यानंतर तो जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहू शकला नाही. साहाने यावेळी ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावा केल्या. साहा बाद झाला तरी साई सुदर्शन मात्र चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत होता. त्याने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याच्या फटक्यांचा जोर वाढला आणि तो शतकाच्या जवळ आला. साई सुदर्शन आता शतक करणार असे वाटत होते. पण यावेळी फक्त चार धावा त्याला शतकासाठी कमी पडल्या. साई सुदर्शनने यावेळी ४७ चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ९६ धावांची दमदार खेळी साकारली. साई सुदर्शनच्या धमाकेदार फटकेबाजीच्या जोरावर गुजरातच्या संघाला २१४ धावांपर्यंत मजल मारता आली.

२५ चेंडूत ४७ धावा करणार्या डेव्हाॅन काॅनवेला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला तर सर्वाधीक बळी मिळवणारा गुजरात टायटन्सनचा मोहम्मद शामी पर्पल कॅपचा मानकरी ठरला. स्पर्धावीर ठरलेला शुभमन गील सर्वाधीक धावांसाठी ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. स्पर्धेत सर्वात लांब ११५ मीटर दूर षटकार फाफ डुप्लसीसने मारला तर उदयोन्मुख खेळाडूचा मान यशस्वी जयस्वालला मिळाला.

अंतिम सामन्यानंतर बोलताना चेन्नईचा पाच वेळचा विजय यशस्वी कप्तान महेंद्र सिंग धोनीने पुढील आयपिएल मध्ये पुनश्च खेळण्याचे संकेत दिले आहेत.

error: Content is protected !!