23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

स्टंटबाजीचा जमाना गेला ; युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक गरजले….|

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : भाषिक तथा मन मताने अमावस्या पौर्णिमेला मतदारसंघात अवतरणाऱ्या आ. नितेश राणे यांनी सोमवारी महसूल विभागात भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना झापण्याची स्टंटबाजी केली. मात्र नितेश राणे यांनी ज्या ज्या विभागात भेट दिली त्या विभागातील रिक्त पदांची माहिती त्यांनी घेऊन सत्तेच्या माध्यमातून ती रिक्त पदे भरणे आवश्यक होते.कणकवली तालुक्यात तलाठ्यांची २० पदे रिक्त आहेत. तसेच तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय येथे देखील महत्वाची अनेक पदे रिक्त आहेत. मात्र रिक्त पदांच्या मूळ प्रश्नाला बगल देऊन शो शायनींग करून, स्टंटबाजी करून आपण जनतेसाठी काम करतोय असे भासवण्याचा प्रयत्न नितेश राणे करत आहेत.कुडाळ मालवणच्या जनतेला केव्हाही उपलब्ध होणारा हक्काचा आमदार लाभला मात्र कणकवली मतदारसंघातील आमदाराला भेटण्यासाठी जनतेला महिने घालवावे लागतात हे दुर्दैव आहे. त्यामुळे जनतेनेही आता माजी खासदार निलेश राणें प्रमाणेच, कणकवलीचा आमदार बदलून नितेश राणेंना कायम स्वरूपी मुंबईत पाठवावे.अशी खरमरीत टीका युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे.

सुशांत नाईक पुढे म्हणाले, नितेश राणे राष्ट्रीय राजकारणात व्यस्त आहेत. मोठं मोठ्या नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करून कणकवली मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची बदनामी ते करत आहेत. हिंदू आणि मुस्लिम धर्मात वाद घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र मतदार संघातील प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयर सुतक नाही. मुळात प्रश्न सोडवायला त्यांच्याजवळ वेळहि नाही. त्यामुळे कणकवली मतदारसंघात समस्या जैसे थे आहेत. सत्तेतील आमदार असूनही जनतेला त्यांच्या आमदारकीचा लाभ घेता येत नाही. नितेश राणे यांना प्रशाकीय ज्ञान नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मतदारसंघाला मिळवून देता येत नाही. कणकवली मतदारसंघात गावागावातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.आता पावसाळा सुरु होणार असल्याने खड्डेमय रस्त्यातूनच नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे.आमदार शिफारशींचे दाखले देखील जनतेला दिले जात नाहीत, आधारकार्ड फॉर्मवर शिफारस दिली जात नाही. त्यामुळे नितेश राणे यांनी आधी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवावे, लोंकाच्या छोट्या गरजा पूर्ण कराव्यात. नंतर स्टंटबाजी करावी अशी घणाघाती टीका सुशांत नाईक यांनी केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!