23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बुधवळ्यात भाजपचा रिव्ह्यू गेला वाया ; खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा शुद्ध ‘फेअर प्ले’ सुरुच..!

- Advertisement -
- Advertisement -

खुद्द बुधवळे सरपंचांनी खासदार विनायक राऊत आणि जनतेचे आमदार वैभव नाईकांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्ले ऑफ टाॅपर

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातून मोठी राजकीय घडामोडीचा दावा करताना खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी थेट मुद्याशीच विचारपुस केली.


बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आले. मात्र आज बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी स्वतः कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन आपण कायम आ. वैभव नाईक आणि शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले. मला सर्वसामान्य शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी निवडून दिले आहे याची मला पूर्णतः जाण आहे.त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीची माहिती देणारे भाजप पदाधिकारी तोंडावर पडले आहेत.

यावेळी खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी संतोष पानवलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपकडून सरपंचाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. इतर सरपंचांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी केल्या. यावेळी विभाग संघटक संतोष घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, शाखाप्रमुख अभिमन्यू येरम, ग्रा.प.सदस्य राजू घागरे आदी उपस्थित होते. माजी पळसंब सरपंच व आचरा विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक चंद्रकांत गोलतकर यांनी अशा तुच्छ राजकीय खेळीवर प्रतिक्रिया देताना म्हणले आणखिन किती “नीच” पातळी खणणार विरोधक. माजी पळसंब सरपंच व आचरा विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक यांनी सांगितले की आमदार वैभव नाईक व आमचा ‘फेअर प्ले’..म्हणजे शुद्ध राजकारण सुरुच राहणार.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खुद्द बुधवळे सरपंचांनी खासदार विनायक राऊत आणि जनतेचे आमदार वैभव नाईकांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्ले ऑफ टाॅपर

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा विभागातून मोठी राजकीय घडामोडीचा दावा करताना खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी थेट मुद्याशीच विचारपुस केली.


बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांना कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आले. मात्र आज बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी स्वतः कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन आपण कायम आ. वैभव नाईक आणि शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले. मला सर्वसामान्य शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी निवडून दिले आहे याची मला पूर्णतः जाण आहे.त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीची माहिती देणारे भाजप पदाधिकारी तोंडावर पडले आहेत.

यावेळी खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी संतोष पानवलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपकडून सरपंचाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. इतर सरपंचांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी केल्या. यावेळी विभाग संघटक संतोष घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, शाखाप्रमुख अभिमन्यू येरम, ग्रा.प.सदस्य राजू घागरे आदी उपस्थित होते. माजी पळसंब सरपंच व आचरा विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक चंद्रकांत गोलतकर यांनी अशा तुच्छ राजकीय खेळीवर प्रतिक्रिया देताना म्हणले आणखिन किती "नीच" पातळी खणणार विरोधक. माजी पळसंब सरपंच व आचरा विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक यांनी सांगितले की आमदार वैभव नाईक व आमचा 'फेअर प्ले'..म्हणजे शुद्ध राजकारण सुरुच राहणार.

error: Content is protected !!