चौके | अमोल गोसावी : श्री क्षेत्र पंढरपूर येथे २६ ते २८ मे दरम्यान संपन्न होत असलेल्या दुसऱ्या ‘राज्यस्तरीय अक्षर संमेलनात’ कुमारी श्रेया समीर चांदरकर हिला अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. श्रेया चांदरकर ही वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असून, तिने विविध रंगीत धाग्यांपासून बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीची देखील सोशल मीडिया व विविध संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर देखील तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला असून तिने विविध माध्यमातून अनेक कलाकृती साकार करत बक्षीसही मिळवली अहेत. राज्यस्तरीय अक्षर संमेलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या कलाकृतीची दखल घेतली. श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात अक्षर गौरव पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात येणार आहे. तिच्या या गौरवाबद्दल तिचे पालक व शाळेचीही सर्वत्र प्रशंसा होत आहे.