मुंबई | ब्युरो न्यूज : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात सध्या चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळते आहे. दोघेही एकमेकांवर सध्या टीकास्त्रं सोडत आहेत.
मुंबई फुटबॉल असोसिएशन, फुटबॉल ऑस्ट्रेलिया आणि मुंबईतील ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासद्वारे आजपासून पुढील दोन दिवस फुटबॉल डेव्हलपमेंट वर्कशॉपचं आयोजन करण्यात आले आहे. या फुटबॉल वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारविरोधात जनमत आहे असे वाटतेय तर वरळी विधानसभेचा राजीनामा द्यावा व तिथे निवडणूक घेऊ व काय होतं ते ते पाहू असे मुनगंटीवार म्हणाले होते. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की आपण हे आव्हान स्वीकारले असून मी राजीनामाही देतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिथे आपला प्रतिस्पर्धी म्हणून उभे करावे असेही प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.