संजय वराडकर | मानद सहसंपादक: कोकणासारख्या प्रदेशात.रेन वाॅटर हार्वेस्टींग ही सर्वात प्रभावी पद्धत आहे ..
पर्यावरण पूरक पद्धतीने व शाश्वत माॅडेल लक्षात घेऊन डोंगराळ पठारी भागात.. तळी अथवा छोटे बंधारे तयार करुन… जास्तीत जास्त पाणी डोंगरांच्या पोटात जीरवल पाहीजे…
जे पुढे वर्षभर नद्यांना मिळत राहील.. नद्या कोरड्या पडणार नाहीत..
तसेच पाणी अडवून त्याचा समुद्रा पर्यंतचा प्रवास संथ केल्यामुळे जमिनीची होणारी धुप थांबेल.. वनउपज व शेती उत्पादन वाढेल..
सकारात्मक विचार करुन सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचा आपल्या भागासाठी फायदा करुन घेऊया..
पाणी वाचवुया.. जमिन समृद्ध करुया..
लोक सहभाग व जागृतीची गरज आहे..
जे जे शाश्वत व सर्वोपयोगी ते ते स्विकारुया, अमलात आणुया..