मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक नियोजन मधून मंजुरी मिळालेल्या चूनवरे तळेवाडी खंबड वाडी चूनवरे बौद्धवाडी स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन माजी बांधकाम व वित्त सभापती अनिल कांदळकर यांचा हस्ते झाले.
यावेळी आमदार नितेश राणे यांचे सचिव श्री राकेश परब, माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई , उपसरपंच कलाधर कूशे, सदस्या शमिका वाडकर, आपू आंबेरकर, विलास पांजरी, नंदू परब, शंकर बागवे, व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर राकेश परब व अनिल कांदळकर यांनी गरजू मुलींना चूनवरे येथे सायकल वाटप केले. सर्व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.