25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण सभेत मालवण मनसेचा ‘रुबाब’ वाढला ; जिल्ह्यातील सर्वात युवा उद्योजक प्रीतम विलास गावडे यांच्यासह मोठी युवा फळी मनसेत सामील.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मालवण शहर व तालुक्यातल्या मनसे मध्ये गेल्या सहा महिन्यांतील एकंदर सामाजिक कामाचा व पक्षप्रवेशाच्या वाढत्या आलेखाने काल ६ मे दिवशीच्या मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या रत्नागिरीच्या भव्य सभेत ‘रुबाबात’ लक्षणीय उसळी घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘सर्वात युवा उद्योजक’ अशी ख्याती प्राप्त केलेले अष्टपैलू व मेहनती युवा व्यक्तिमत्व प्रीतम विलास गावडे यांच्यासह असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. मालवण तालुक्यातील चौके येथील दिवंगत व्यावसायीक व उद्योजक कै. विलास गावडे यांचे चिरंजीव असणार्या प्रितम विलास गावडे यांनी रत्नागिरीच्या जाहीर सभेत खुद्द मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला ही बाबही मालवणातील राजकारण जगतात विशेष प्रभावी लक्षणीय मानली जात आहे. त्यांच्यासोबत मालवण मधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा देखील मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला आहे ही गोष्ट सुद्धा ‘एक वेगळा मैलाचा दगड’ मानला जात आहे.

चौके येथील विलास गावडे कंन्स्ट्रक्शन व मालवण शहरातील ‘रुबाब मेन्स वेअर’ या दोन महत्वाच्या आस्थापनांचे सर्वेसर्वा असलेल्या प्रितम विलास गावडे यांच्यासोबत गणेश सातार्डेकर, राहुल मोंडकर, लौकिक मेथर, तथागत मालवणकर, चिन्मय कुणकवळेकर, प्रमोद डिचवलकर, रोहन तावडे, हर्ष जोशी हे या प्रवेशावेळी उपस्थित होते.

या ‘मेगा मनसे प्रवेशा’ साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत, मनसे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मनसेचे ज्येष्ठ नेते अमित इब्रामपूरकर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी सिंधुदुर्ग चे संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल , मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड व मनसेचे ज्येष्ठ मनसैनिक व माजी पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. प्रितम विलास गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाने मालवण मनसेला आणखीन चैतन्य मिळेल तसेच लवकरच मालवणात मनसे पक्ष प्रवेशाचा एक सिलसिला सुरु होणार असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ मनसैनिक, आजी माजी पदाधिकारी , मनसेच्या महिला सैनिक भगिनी तसेच मनविसे अशी सक्षम मनसे पक्ष यंत्रणा आता निर्माण होत असल्याने मालवण तालुक्यातील सर्व पातळ्यांवर एक सर्वात सक्रीय राजकीय पक्ष व समाज सेवक सक्षम संघटना अशी मनसेची ओळख आता आपल्या पुढील झेपेसाठी सज्ज आहे असेही ज्येष्ठ नेते अमित इभ्रामपूरकर यांनी ज्येष्ठ मनसैनिकांच्या वतीने सांगितले असून प्रितम विलास गावडे यांच्यासह असंख्य नवीन मनसैनिकांचे पक्षात स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मालवण शहर व तालुक्यातल्या मनसे मध्ये गेल्या सहा महिन्यांतील एकंदर सामाजिक कामाचा व पक्षप्रवेशाच्या वाढत्या आलेखाने काल ६ मे दिवशीच्या मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या रत्नागिरीच्या भव्य सभेत 'रुबाबात' लक्षणीय उसळी घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'सर्वात युवा उद्योजक' अशी ख्याती प्राप्त केलेले अष्टपैलू व मेहनती युवा व्यक्तिमत्व प्रीतम विलास गावडे यांच्यासह असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. मालवण तालुक्यातील चौके येथील दिवंगत व्यावसायीक व उद्योजक कै. विलास गावडे यांचे चिरंजीव असणार्या प्रितम विलास गावडे यांनी रत्नागिरीच्या जाहीर सभेत खुद्द मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला ही बाबही मालवणातील राजकारण जगतात विशेष प्रभावी लक्षणीय मानली जात आहे. त्यांच्यासोबत मालवण मधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांचा देखील मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला आहे ही गोष्ट सुद्धा 'एक वेगळा मैलाचा दगड' मानला जात आहे.

चौके येथील विलास गावडे कंन्स्ट्रक्शन व मालवण शहरातील 'रुबाब मेन्स वेअर' या दोन महत्वाच्या आस्थापनांचे सर्वेसर्वा असलेल्या प्रितम विलास गावडे यांच्यासोबत गणेश सातार्डेकर, राहुल मोंडकर, लौकिक मेथर, तथागत मालवणकर, चिन्मय कुणकवळेकर, प्रमोद डिचवलकर, रोहन तावडे, हर्ष जोशी हे या प्रवेशावेळी उपस्थित होते.

या 'मेगा मनसे प्रवेशा' साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत, मनसे राज्य सरचिटणीस व माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मनसेचे ज्येष्ठ नेते अमित इब्रामपूरकर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी सिंधुदुर्ग चे संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल , मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड व मनसेचे ज्येष्ठ मनसैनिक व माजी पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. प्रितम विलास गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाने मालवण मनसेला आणखीन चैतन्य मिळेल तसेच लवकरच मालवणात मनसे पक्ष प्रवेशाचा एक सिलसिला सुरु होणार असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ मनसैनिक, आजी माजी पदाधिकारी , मनसेच्या महिला सैनिक भगिनी तसेच मनविसे अशी सक्षम मनसे पक्ष यंत्रणा आता निर्माण होत असल्याने मालवण तालुक्यातील सर्व पातळ्यांवर एक सर्वात सक्रीय राजकीय पक्ष व समाज सेवक सक्षम संघटना अशी मनसेची ओळख आता आपल्या पुढील झेपेसाठी सज्ज आहे असेही ज्येष्ठ नेते अमित इभ्रामपूरकर यांनी ज्येष्ठ मनसैनिकांच्या वतीने सांगितले असून प्रितम विलास गावडे यांच्यासह असंख्य नवीन मनसैनिकांचे पक्षात स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!