24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

संकल्पना पूर्ततेतचे ‘अमीर ‘, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे..! ( संपादकीय )

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित (मुख्य संपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर हे सर्वार्थाने गतीशिल किंवा ‘हॅपनींग’ अशा स्वरुपाचे आहे . मुंबईतील एखादे उपनगरच वाटावे अशी त्या शहराची एकंदर रचना, वर्दळ आणि जिल्ह्यातील राजकीय खलबतं व समिकरणांची पंढरी म्हणणे वावगं ठरणार नाही.

अशा कणकवली शहरातील नगरपंचायत हा तिथल्या सत्ताधारी लोक प्रतिनिधींसाठी एक वरवर राजकीय, प्रशासकीय, शासकीय प्रपंच जरी वाटला तरी तो ‘सामाजिक’ पद्धतीनेच हाताळणे हे एक कौशल्यपूर्ण कर्तव्य तर आहे. लोकप्रतिनिधींचा सत्तेतील नेता तथा कॅप्टन असणे याला नगराध्यक्ष म्हणतात आणि हाच कॅप्टन कणकवली शहराला गेली संपूर्ण टर्म एका राजकीय गतीशिलतेसोबत सामाजिक प्रगतीशीलतेकडेही नेतोय हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि अगदी महाराष्ट्र राज्यदेखील जरुर जाणतात. त्या कॅप्टनचे नांव आहे कणकवली नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे.

आजचा कोणताही राजकीय व्यक्ती विशेष सोशल मिडिया या तत्काळ परिणामकारक घटकामुळे किती दडपणाखाली असतो याची कल्पना फक्त राजकीय व्यक्तीच करु शकत असतील पण असे असताना स्वतः सोबत नगरपंचायत, पक्षातील आदरणीय वरिष्ठ, सोबतचे साथ देणारे सहकारी नगरसेवक , प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि जनता यांना सोबत घेऊन नांदणे ही गोष्ट केवळ सत्ता असून प्रसन्न रहात नसते तर त्यासाठी सर्वांगीण उपक्रम, बदलत्या काळासोबतची अपग्रेडेशन्स, विरोधकांना तक्रार निवारणासाठी उचित् संधी आणि शहरातील मूलभूत सोयी सुविधांसह निरोगी नागरीक टक्का वाढवत रहाणे ही दमछाक करणारी दैनंदिनी सांभाळावी लागते…आणि नगराध्यक्ष समीर नलावडे या गोष्टी दमछाक न वाटता प्रसन्नतेने वावरताना दिसतात. बच्चे कंपनीच्या ‘किलबिल’ पासून ते महिला, वृद्ध यांच्याही सांस्कृतिक आनंदासाठी किंवा आठवडी बाजार, स्थानिक कुशल कलाकारांच्या वस्तुंचा दिवाळी बाजार, आपल्या सहकार्यांना सोबत घेत घेत ते ‘स्वजबाबदारीवर’ जेंव्हा महोत्सव,उपक्रम आखतात व अंमलात आणतात तेंव्हा नगराध्यक्ष समीर नलावडे हे पक्ष वगैरेंच्या पल्याड ‘राज्यशास्त्राच्या’ विद्यार्थ्यांसाठी एक चालतं-बोलतं-धावतं तरिही ‘अढळ’ असे विद्यापीठ ठरतात.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पनेचा उदय झाल्यानंतर त्याची किती परिपूर्ण सकारात्मक पूर्तता करता येईल याचे प्रयत्न नगराध्यक्ष समीर नलावडे करतात…तेही त्यांच्या नगरपंचायत मधिल सहकारी लोकप्रतिनिधींसोबत..! वैयक्तिक अशाही अनेक संकल्पना त्यांनी अंमलात आणल्या ज्यात प्रामुख्याने ‘वैकुंठ रथ’…जो त्यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांना समर्पीत करुन समाजासाठी अर्पित केलेला आहे.

कालच नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा कणकवली तालुका व्यापारी संघटनेने विशेष सत्कार केला. ही केवळ ‘बातमी’ असूच शकत नाही तर तो एक समाज सफल प्रवास आहे कारण व्यापारी वर्ग हा सामान्य ते शासन-प्रशासन यांना जोडणारा एक दुवा असतो आणि त्या दुव्याला जर सत्तेतील लोकप्रतिनिधी सकारात्मक संकल्पना पूर्ततेचे धनी आहेत असे वाटले तरच ते सहर्ष गौरव करतात. कणकवली नगरपंचायतने विविध उपक्रम आणि करवसुली या मध्ये नगरपालिका वर्गवारी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला हे त्या सत्काराचे वस्तुनिष्ठ व सात्विक कारण होते. कणकवली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.दीपक बेलवलकर यांच्या हस्ते नगराध्यक्षांसोबतच त्यांना नेहमी खंदी साथ देणारे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, प्रशासकीय कप्तान तथा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचाही सत्कार करण्यात आला. व्यापारी संघटनेने नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकारी घटकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

राज्य शासनाच्या गौरवानंतर स्थानिक व्यापारी संघटनेचा गौरव हा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासाठी नक्कीच सर्वोच्च असाच असेल कारण मुख्य महामार्गावरचे व ते ही शहर विकास आराखडा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर असे अतीशय नाजुक विषय हाताळत कणकवली शहर कोरोना काळात किती ‘तणावाखाली’ सांभाळावं लागलं असेल ते केवळ ‘नगराध्यक्ष समीर नलावडे’ आणि त्यांच्या आतला नुसता कणकवलीचा एक सामान्य ‘समीर नलावडे’ हे दोघेच जाणत असतील.

सत्कार घरचा असला की माणुस कितीतरी पटीने अमीर बनतो…आणि समीर नलावडे मुळातच संकल्पना पूर्ततेचे ‘अमीर ‘ आहेतच.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित (मुख्य संपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर हे सर्वार्थाने गतीशिल किंवा 'हॅपनींग' अशा स्वरुपाचे आहे . मुंबईतील एखादे उपनगरच वाटावे अशी त्या शहराची एकंदर रचना, वर्दळ आणि जिल्ह्यातील राजकीय खलबतं व समिकरणांची पंढरी म्हणणे वावगं ठरणार नाही.

अशा कणकवली शहरातील नगरपंचायत हा तिथल्या सत्ताधारी लोक प्रतिनिधींसाठी एक वरवर राजकीय, प्रशासकीय, शासकीय प्रपंच जरी वाटला तरी तो 'सामाजिक' पद्धतीनेच हाताळणे हे एक कौशल्यपूर्ण कर्तव्य तर आहे. लोकप्रतिनिधींचा सत्तेतील नेता तथा कॅप्टन असणे याला नगराध्यक्ष म्हणतात आणि हाच कॅप्टन कणकवली शहराला गेली संपूर्ण टर्म एका राजकीय गतीशिलतेसोबत सामाजिक प्रगतीशीलतेकडेही नेतोय हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि अगदी महाराष्ट्र राज्यदेखील जरुर जाणतात. त्या कॅप्टनचे नांव आहे कणकवली नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे.

आजचा कोणताही राजकीय व्यक्ती विशेष सोशल मिडिया या तत्काळ परिणामकारक घटकामुळे किती दडपणाखाली असतो याची कल्पना फक्त राजकीय व्यक्तीच करु शकत असतील पण असे असताना स्वतः सोबत नगरपंचायत, पक्षातील आदरणीय वरिष्ठ, सोबतचे साथ देणारे सहकारी नगरसेवक , प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि जनता यांना सोबत घेऊन नांदणे ही गोष्ट केवळ सत्ता असून प्रसन्न रहात नसते तर त्यासाठी सर्वांगीण उपक्रम, बदलत्या काळासोबतची अपग्रेडेशन्स, विरोधकांना तक्रार निवारणासाठी उचित् संधी आणि शहरातील मूलभूत सोयी सुविधांसह निरोगी नागरीक टक्का वाढवत रहाणे ही दमछाक करणारी दैनंदिनी सांभाळावी लागते…आणि नगराध्यक्ष समीर नलावडे या गोष्टी दमछाक न वाटता प्रसन्नतेने वावरताना दिसतात. बच्चे कंपनीच्या 'किलबिल' पासून ते महिला, वृद्ध यांच्याही सांस्कृतिक आनंदासाठी किंवा आठवडी बाजार, स्थानिक कुशल कलाकारांच्या वस्तुंचा दिवाळी बाजार, आपल्या सहकार्यांना सोबत घेत घेत ते 'स्वजबाबदारीवर' जेंव्हा महोत्सव,उपक्रम आखतात व अंमलात आणतात तेंव्हा नगराध्यक्ष समीर नलावडे हे पक्ष वगैरेंच्या पल्याड 'राज्यशास्त्राच्या' विद्यार्थ्यांसाठी एक चालतं-बोलतं-धावतं तरिही 'अढळ' असे विद्यापीठ ठरतात.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पनेचा उदय झाल्यानंतर त्याची किती परिपूर्ण सकारात्मक पूर्तता करता येईल याचे प्रयत्न नगराध्यक्ष समीर नलावडे करतात…तेही त्यांच्या नगरपंचायत मधिल सहकारी लोकप्रतिनिधींसोबत..! वैयक्तिक अशाही अनेक संकल्पना त्यांनी अंमलात आणल्या ज्यात प्रामुख्याने 'वैकुंठ रथ'…जो त्यांनी त्यांच्या दिवंगत वडिलांना समर्पीत करुन समाजासाठी अर्पित केलेला आहे.

कालच नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा कणकवली तालुका व्यापारी संघटनेने विशेष सत्कार केला. ही केवळ 'बातमी' असूच शकत नाही तर तो एक समाज सफल प्रवास आहे कारण व्यापारी वर्ग हा सामान्य ते शासन-प्रशासन यांना जोडणारा एक दुवा असतो आणि त्या दुव्याला जर सत्तेतील लोकप्रतिनिधी सकारात्मक संकल्पना पूर्ततेचे धनी आहेत असे वाटले तरच ते सहर्ष गौरव करतात. कणकवली नगरपंचायतने विविध उपक्रम आणि करवसुली या मध्ये नगरपालिका वर्गवारी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला हे त्या सत्काराचे वस्तुनिष्ठ व सात्विक कारण होते. कणकवली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री.दीपक बेलवलकर यांच्या हस्ते नगराध्यक्षांसोबतच त्यांना नेहमी खंदी साथ देणारे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, प्रशासकीय कप्तान तथा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचाही सत्कार करण्यात आला. व्यापारी संघटनेने नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकारी घटकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

राज्य शासनाच्या गौरवानंतर स्थानिक व्यापारी संघटनेचा गौरव हा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासाठी नक्कीच सर्वोच्च असाच असेल कारण मुख्य महामार्गावरचे व ते ही शहर विकास आराखडा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर असे अतीशय नाजुक विषय हाताळत कणकवली शहर कोरोना काळात किती 'तणावाखाली' सांभाळावं लागलं असेल ते केवळ 'नगराध्यक्ष समीर नलावडे' आणि त्यांच्या आतला नुसता कणकवलीचा एक सामान्य 'समीर नलावडे' हे दोघेच जाणत असतील.

सत्कार घरचा असला की माणुस कितीतरी पटीने अमीर बनतो…आणि समीर नलावडे मुळातच संकल्पना पूर्ततेचे 'अमीर ' आहेतच.

error: Content is protected !!