सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडा (देवगडच्या) साहित्यिका व भाषा तज्ञ अनुराधा दीक्षित होत्या निमंत्रित कवयित्री.
वैशाली पंडित | उपसंपादक : निव्वळ महिलांचे असे साहित्यिक कार्यक्रम ही गोष्ट तशी परिचयाची आहे परंतु निव्वळ लेखिकांचे ‘जश्न -ए-अदब’ म्हणजेच साहित्य संमेलन हा दुर्मिळ सोहळा नुकताच ठाण्यात संपन्न झाला
‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनात रत्नागिरीतील व कोकणातील लेखिकांनी ठसा उमटवला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग इथून संयुक्त पणे १६ सिद्धहस्त लेखिका या संमेलनात सहभागी झाल्या होत्या. कवी संमेलन, परिसंवाद याद्वारे महिला साहित्यिकांनी या संमेलनात सादरीकरण केले. महाराष्ट्र आणि गुजरातमधील सुमारे ४५० लेखिकांनी या साहित्य आनंद मेळ्यात सहभाग घेतला. नटून थटून आलेल्या लेखिकांनी रामनामाचा गजरात आणि ढोल, ताशा, लेझिमच्या तालावर ग्रंथ दिंडी मार्गाक्रमत सोहळ्याची सुरवात झाली. आम्ही सिद्ध लेखिका साहित्य पुस्तकांचे प्रकाशन झाले.
रामनामाचा गजर करत ढोल, ताशा, अभिव्यक्त केला. त्यानंतर उद्घाटक लेझिमच्या गजरात ग्रंथदिंडी काढली. वीणा गवाणकर, स्वागताध्यक्ष उषा रत्नागिरीतील सोनाली सावंत यांनी ग्रंथपालखी डोक्यावर घेऊन नाचवत कोकणची संस्कृती दाखवत सर्वांची आदराचा वाहवा मिळवली. महाराष्ट्र राज्य गीत व नृत्याद्वारे शारदेला वंदनही केले गेले. संस्थेच्या अध्यक्ष पद्माताई हुशिंग यांनी ‘आम्ही सिद्ध लेखिका साहित्य’ संस्थेच्या प्रवासाचा सहज सुंदर आढावा घेतला. त्यानंतर उद्घाटक वीणा गवाणकर, स्वागताध्यक्ष उषा चांदूरकर, संमेलनाध्यक्ष शुभांगी भडभडे, प्रमुख पाहुण्या माधवी नाईक यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली. या नंतर ‘सिध्द सखी’ विशेषांकाचे प्रकाशन संपन्न झाले. या दरम्यान ठाणे जिल्ह्यासह इतर ८ जिल्ह्यातील लेखिकांच्या पुस्तकांचे प्रकाशनही झाले.
मंगला गोडबोले आणि मंगला खाडिलकर यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीतून त्यांचा जीवन पट उलगडला. सिद्ध लेखिका संस्थेच्या सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधित्व करणाऱ्या कवयित्रींच्या कवी संमेलनाचा रसास्वाद घेतला. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्याच्या ज्योत्स्ना चांदगुडे, प्रमुख पाहुण्या रत्नागिरीच्या सुनेत्रा जोशी आणि नागपूरच्या कविता कठाणे उपस्थित होत्या. ‘ती’ या विषयावरील वैविध्यपूर्ण कविता सादर झाल्या. याच विषयावर मार्च महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी कोकण विभागाने पेलली होती. यशस्वीनी कवयित्रींना पारितोषिके देण्यात आली. यात रत्नागिरीच्या मीनल ओक यांना तृतीय क्रमांक मिळाला. ऋतुजा कुळकर्णी, शर्वरी जोशी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका व भाषा तज्ञ अनुराधा दीक्षित ( वाडा,देवगड), रेखा जेगरकल, यांनी निमंत्रित कवयित्री म्हणून कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्या सुनेत्रा जोशी यांनी मनोगतावेळी बहारदार गझल सादर केली. त्यानंतर ‘ती बोलू लागली’ हा परिसंवाद झाला.त्यात वकील प्रार्थना सदावर्ते, सीमंतिनी नूलकर, सामाजिक कार्यकर्त्या नयना सहस्रबुद्धे यांनी विचार मांडले. शुभांगी भडभडे यांना साहित्य तपस्विनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हे पहिले राज्यस्तरीय संमेलन उत्तम रितीने पार पडण्यात आम्ही सिद्ध लेखिका साहित्य संस्थेच्या अध्यक्ष पद्माताई हुशिंग व सहकारी साहित्यिकांचे योगदान महत्वाचे ठरले.