28.2 C
Mālvan
Tuesday, April 22, 2025
IMG-20240531-WA0007

पळसंब ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

- Advertisement -
- Advertisement -

कंत्राट, कंत्राटदार, केलेले काम सर्वच बेकायदेशीर असल्याचा माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचा कागदपत्रांसहीत दावा.

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : मागील ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय व सामाजिक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण म्हणून नावाजल्या गेलेल्या पळसंब ग्रामपंचायतीच्या बाबतीत व खुद्द पळसंब गांवचे सद्य सरपंचांच्या बाबतीत सध्या आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी यावेळी ग्रामपंचायतच्या कंत्राट, कंत्राटदार व संबंधित कामेच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी यांच्या म्हणण्यानुसार, सिंधुदुर्ग, ग्रामीण भागातील विकासासाठी निधी दिला जातो, त्यामार्फत कंत्राटे काढून पारदर्शीपणे कामे देऊन अंदाजपत्रकानुसार कामे केली जातात असा सरकारचा दावा असतो. परंतु,अशा पद्धतीने खरेच कामे होतात का हा प्रश्न आता उपस्थित राहिला असल्याचे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कामाची कंत्राटे देताना आणि कामाचे आदेश देताना कशा प्रकारे डोळेझाक केली जाते हे मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायतीत पाहायला मिळत आहे कारण गावातील दोन कामांबाबत एका कामात कंत्राटदार ‘जीएसटीधारक नसतानाही’ त्याला कंत्राट प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे तर दुसर्‍या कामात प्रसिद्ध केलेल्या अंदाजपत्रकाची रक्कम वेगळी आणि केलेले काम त्यापेक्षा अगदी कमी किमतीत दिशाभूल करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे असे प्रतिपादन चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.

पहिल्या कंत्राटात पळसंब गांवचे आराध्य दैवत असलेल्या श्री. आई जयंतीदेवी मंदिर परिसरात सुशोभिकरण करण्यासाठी निधी देण्यात आला होता. परंतु जीएसटीधारक नसलेल्या कंत्राटदार श्री. सुधीर माने यांना बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले तर या कंत्राटदाराने ७.२ % कमी दराने कंत्राट भरून कामाचे नुकसानच होणार आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे असेही चंद्रकांत गोलतकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित बेकायदेशीर कंत्राट रद्द करावे अशी जोरदार मागणी होत आहे. याआधी मंदिर परिसरातील कामे देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या देखरेखीखाली केली जात होती. परंतु, आता ही कामे करताना सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासन कोणालाच विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत असेही सांगितले जात आहे .

तर दुसरीकडे संपूर्ण पळसंब गावासाठी महत्वाची असणार्‍या स्मशानभूमी दुरूस्तीच्या कामात हेराफेरी झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. एवढे महत्वाचे काम ग्रामस्थांना विचारात न घेता करण्यात आले आहे.या कामाची १,१७,१५३ रूपयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामात अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आले नसून केवळ दुय्यम दर्जाचे सिमेंटचे पत्रे वापरण्यात येऊन प्रत्यक्षात ७० हजारांचे सरकारी काम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हे कामे ८.५ % कमी दराने भरण्यात आले होते. सरकार निधी देते पण ग्रामस्थांना विचारात न घेता अशाच पद्धतीने कामे होत आहेत असा गंभीर आरोप चंद्रकांत गोलतकर यांनी ग्रामस्थांच्या हवाल्याने व काही कागदपत्रांद्वारे दिला आहे. या संदर्भात चंद्रकांत गोलतकर यांनी अधिकृत निवेदन देखील अर्ज सरपंचांना दिला आहे.

पळसंब गावचे सरपंच ग्रामस्थांना विचारात न घेता मनमानी पद्धतीने अशा कामांना पाठिंबा देत आहेत. अशा बेकायदेशीर मक्तेदारांना गावात विरोध असताना देखील सरपंच यांना पाठिशी घालायचे काम करत आहेत. अशा कंत्राटदाराची कामे रद्द करून त्यांना गांवात पुन्हा कधीही कंत्राट देऊ नये आणि स्मशानभूमीचे काम बोगस झाले असून प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार काम व्हायला पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत असेही माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबींनंतर पळसंब ग्रामसेवक अमित कांबळी यांनी
‘संबंधित कंत्राटदाराकडे जीएसटी क्रमांक नाही ही बाब आम्हाला आताच समजली.त्यानुसार कारवाई करण्यात येईल.तसेच स्मशानभूमीचे काम लवकर व्हावे तसेच कामात आमच्याकडे जेवढा निधी होता तेवढेच काम करण्यात आले.निविदेनुसार काम व्हायला पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे’ अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे तर आपण याबाबत ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलेल्या रकमेचे अंदाजपत्र बनवून देण्यात आले असल्याचे अभियंता अक्षय मगर यांनी स्पष्ट केले आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात घेता विद्यमान सरपंच महेश वरक यांना स्थानिक ग्रामस्थांची खरेच साथ नाही आहे का किंवा सरपंच आणि ग्रामस्थ यांच्यातील संवादाचा अभाव आहे का किंवा पळसंब ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होऊनही गावाचे ग्रामपंचायत सदस्यांचे ध्येयधोरणांचे ऐक्य राजकीय कारणांनी कलुषीत होतंय का असे सामाजिक प्रश्न आहेतच परंतु शासकीय व प्रशासकीय स्तरावर याची नेमकी कारणे तथा चौकशी होणार का हे पहाणे महत्वाचे ठरेल.

(प्रमुख फोटो : पळसंब स्मशान शेड)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कंत्राट, कंत्राटदार, केलेले काम सर्वच बेकायदेशीर असल्याचा माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचा कागदपत्रांसहीत दावा.

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : मागील ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय व सामाजिक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण म्हणून नावाजल्या गेलेल्या पळसंब ग्रामपंचायतीच्या बाबतीत व खुद्द पळसंब गांवचे सद्य सरपंचांच्या बाबतीत सध्या आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी यावेळी ग्रामपंचायतच्या कंत्राट, कंत्राटदार व संबंधित कामेच बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी यांच्या म्हणण्यानुसार, सिंधुदुर्ग, ग्रामीण भागातील विकासासाठी निधी दिला जातो, त्यामार्फत कंत्राटे काढून पारदर्शीपणे कामे देऊन अंदाजपत्रकानुसार कामे केली जातात असा सरकारचा दावा असतो. परंतु,अशा पद्धतीने खरेच कामे होतात का हा प्रश्न आता उपस्थित राहिला असल्याचे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कामाची कंत्राटे देताना आणि कामाचे आदेश देताना कशा प्रकारे डोळेझाक केली जाते हे मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायतीत पाहायला मिळत आहे कारण गावातील दोन कामांबाबत एका कामात कंत्राटदार 'जीएसटीधारक नसतानाही' त्याला कंत्राट प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे तर दुसर्‍या कामात प्रसिद्ध केलेल्या अंदाजपत्रकाची रक्कम वेगळी आणि केलेले काम त्यापेक्षा अगदी कमी किमतीत दिशाभूल करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे असे प्रतिपादन चंद्रकांत गोलतकर यांनी केले आहे.

पहिल्या कंत्राटात पळसंब गांवचे आराध्य दैवत असलेल्या श्री. आई जयंतीदेवी मंदिर परिसरात सुशोभिकरण करण्यासाठी निधी देण्यात आला होता. परंतु जीएसटीधारक नसलेल्या कंत्राटदार श्री. सुधीर माने यांना बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले तर या कंत्राटदाराने ७.२ % कमी दराने कंत्राट भरून कामाचे नुकसानच होणार आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे असेही चंद्रकांत गोलतकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित बेकायदेशीर कंत्राट रद्द करावे अशी जोरदार मागणी होत आहे. याआधी मंदिर परिसरातील कामे देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या देखरेखीखाली केली जात होती. परंतु, आता ही कामे करताना सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासन कोणालाच विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत असेही सांगितले जात आहे .

तर दुसरीकडे संपूर्ण पळसंब गावासाठी महत्वाची असणार्‍या स्मशानभूमी दुरूस्तीच्या कामात हेराफेरी झाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. एवढे महत्वाचे काम ग्रामस्थांना विचारात न घेता करण्यात आले आहे.या कामाची १,१७,१५३ रूपयांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामात अंदाजपत्रकानुसार काम करण्यात आले नसून केवळ दुय्यम दर्जाचे सिमेंटचे पत्रे वापरण्यात येऊन प्रत्यक्षात ७० हजारांचे सरकारी काम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हे कामे ८.५ % कमी दराने भरण्यात आले होते. सरकार निधी देते पण ग्रामस्थांना विचारात न घेता अशाच पद्धतीने कामे होत आहेत असा गंभीर आरोप चंद्रकांत गोलतकर यांनी ग्रामस्थांच्या हवाल्याने व काही कागदपत्रांद्वारे दिला आहे. या संदर्भात चंद्रकांत गोलतकर यांनी अधिकृत निवेदन देखील अर्ज सरपंचांना दिला आहे.

पळसंब गावचे सरपंच ग्रामस्थांना विचारात न घेता मनमानी पद्धतीने अशा कामांना पाठिंबा देत आहेत. अशा बेकायदेशीर मक्तेदारांना गावात विरोध असताना देखील सरपंच यांना पाठिशी घालायचे काम करत आहेत. अशा कंत्राटदाराची कामे रद्द करून त्यांना गांवात पुन्हा कधीही कंत्राट देऊ नये आणि स्मशानभूमीचे काम बोगस झाले असून प्रसिद्ध केलेल्या निविदेनुसार काम व्हायला पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत असेही माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबींनंतर पळसंब ग्रामसेवक अमित कांबळी यांनी
'संबंधित कंत्राटदाराकडे जीएसटी क्रमांक नाही ही बाब आम्हाला आताच समजली.त्यानुसार कारवाई करण्यात येईल.तसेच स्मशानभूमीचे काम लवकर व्हावे तसेच कामात आमच्याकडे जेवढा निधी होता तेवढेच काम करण्यात आले.निविदेनुसार काम व्हायला पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे' अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे तर आपण याबाबत ग्रामपंचायत प्रशासन यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलेल्या रकमेचे अंदाजपत्र बनवून देण्यात आले असल्याचे अभियंता अक्षय मगर यांनी स्पष्ट केले आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात घेता विद्यमान सरपंच महेश वरक यांना स्थानिक ग्रामस्थांची खरेच साथ नाही आहे का किंवा सरपंच आणि ग्रामस्थ यांच्यातील संवादाचा अभाव आहे का किंवा पळसंब ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होऊनही गावाचे ग्रामपंचायत सदस्यांचे ध्येयधोरणांचे ऐक्य राजकीय कारणांनी कलुषीत होतंय का असे सामाजिक प्रश्न आहेतच परंतु शासकीय व प्रशासकीय स्तरावर याची नेमकी कारणे तथा चौकशी होणार का हे पहाणे महत्वाचे ठरेल.

(प्रमुख फोटो : पळसंब स्मशान शेड)

error: Content is protected !!