24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने श्रीदेवी दुर्गामातेची भक्तीउत्साहात प्रतिष्ठापना….!

- Advertisement -
- Advertisement -

नवरात्रोत्सवाचे सातत्यपूर्ण तिसरे वर्ष

१३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता रंगणार ट्वेंटी ट्वेंटी डबलबारी भजनाचा सामना

कणकवली |उमेश परब : संदीप चौकेकर मित्र मंडळ शिरवल खासकीलवाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात श्री देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करत देवीची मूर्ती वाजत गाजत विराजमान करण्यात आली. संदीप चौकेकर मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.

संदिप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी श्री दुर्गादेवीचे प्रतिष्ठापना केली जाते. नऊदिवस विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, यावर्षी सुद्धा दररोज देवीची नित्य पूजा,आरती, भजने,हरीपाठ, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

घटस्थापनेदिवशी दुपारी १२ वाजता दुर्गामातेच्या मूर्तीची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी संदिप चौकेकर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी देवीची विधिवत पुजा व आरती केली.देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

यावेळी श्रीकृष्ण यादव, राहुल राणे, गुरुनाथ चौकेकर, अरुण चौकेकर, किरण गावडे ,साहिल चव्हाण, तेजस गोळवळकर , सिद्धेश चौकेकर ,राजाराम दळवी, अजित पेंडुरकर, रामा गोळवणकर, अरविंद यादव ,सचिन लाड , सिद्धेस चौकेकर , बबलू लाड, प्रदीप चौकेकर, दत्‍ताराम पेंडुरकर ,विकास परब आदी संदीप चौकेकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

१३ ऑक्टोबर रोजी शिरवल खासकीलवाडी येथे रात्री ८ वाजता नवरात्रौत्सवा निमित्त डबलभारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. बुवा संदीप लोके, श्री वरची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड विरुद्ध बुवा नारायण मिरजकर , हनुमान प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी यांच्‍यात डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे.

१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता आरती व तीर्थप्रसाद दुपारी १ वाजता भंडारा (महाप्रसाद)दुपारी ३ ते ६ वाजता हळदीकुंकू ‘सायंकाळी ७ वाजता हरिपाठ रात्री ९ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

भाविक भक्तांनी डबलभारी भजनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदिप चौकेकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवरात्रोत्सवाचे सातत्यपूर्ण तिसरे वर्ष

१३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता रंगणार ट्वेंटी ट्वेंटी डबलबारी भजनाचा सामना

कणकवली |उमेश परब : संदीप चौकेकर मित्र मंडळ शिरवल खासकीलवाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात श्री देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करत देवीची मूर्ती वाजत गाजत विराजमान करण्यात आली. संदीप चौकेकर मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.

संदिप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी श्री दुर्गादेवीचे प्रतिष्ठापना केली जाते. नऊदिवस विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, यावर्षी सुद्धा दररोज देवीची नित्य पूजा,आरती, भजने,हरीपाठ, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

घटस्थापनेदिवशी दुपारी १२ वाजता दुर्गामातेच्या मूर्तीची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी संदिप चौकेकर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी देवीची विधिवत पुजा व आरती केली.देवीच्या आसनाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

यावेळी श्रीकृष्ण यादव, राहुल राणे, गुरुनाथ चौकेकर, अरुण चौकेकर, किरण गावडे ,साहिल चव्हाण, तेजस गोळवळकर , सिद्धेश चौकेकर ,राजाराम दळवी, अजित पेंडुरकर, रामा गोळवणकर, अरविंद यादव ,सचिन लाड , सिद्धेस चौकेकर , बबलू लाड, प्रदीप चौकेकर, दत्‍ताराम पेंडुरकर ,विकास परब आदी संदीप चौकेकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

१३ ऑक्टोबर रोजी शिरवल खासकीलवाडी येथे रात्री ८ वाजता नवरात्रौत्सवा निमित्त डबलभारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. बुवा संदीप लोके, श्री वरची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ देवगड विरुद्ध बुवा नारायण मिरजकर , हनुमान प्रासादिक भजन मंडळ रत्नागिरी यांच्‍यात डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे.

१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता आरती व तीर्थप्रसाद दुपारी १ वाजता भंडारा (महाप्रसाद)दुपारी ३ ते ६ वाजता हळदीकुंकू 'सायंकाळी ७ वाजता हरिपाठ रात्री ९ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

भाविक भक्तांनी डबलभारी भजनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदिप चौकेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!