24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी दुसर्याच्या कामांवर स्वतःच्या श्रेयांचे स्टीकर लावणे बंद करावे : माजी खासदार डाॅ. निलेश राणे.

- Advertisement -
- Advertisement -

देशातील रिकामटेकड्या लोकनेत्यांच्या यादीत नांव घेतले जाईल असाही लगावला टोला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली असून त्यांना ‘श्रेय घेणारे रिकामटेकडे लोकनेते’ बनू नका असा सल्ला दिला आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव आणि वराड पुलाच्या पहाणीसाठी गेले असता आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी संबंधित ठेकेदाराला २० मे पर्यंत काम पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकायच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या त्याबबत माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी माध्यमांशी दृकश्राव्य संदेशातून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

ही वरील दोन्ही कामे २०१४ व २०१७ ला वर्क ऑर्डर अनुसार कार्यान्वित असताना म्हणजेच गेल्या ९ वर्षातील आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या कार्यकालातील असताना ती अजून पूर्ण झाली नव्हती. भाजपाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आपण स्वतः त्याबाबत २ महिन्यांपूर्वीच ठेकेदाराला ‘त्याला समजेल अशा पद्धतीने ‘ काम पूर्ण करायला सांगितले होते व ते काम आता जवळपास ९० ते ९५% पूर्णत्वाकडे असून ही गोष्ट आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या लक्षात आल्यावर केवळ श्रेयवादासाठी काल वराड व अणाव येथे गेले असा आरोप माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी केला आहे.

आता गेली ८ ते ९ महिने राज्य सरकार सगळी कामे सक्षमपणे करत असून आतातरी आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी स्वतः काहीतरी सकारात्मक करावे अन्यथा देशातील रिकामटेकड्या लोकनेत्यांच्या यादीत त्यांचे नांव घेतले जाईल असा टोला देखिल माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी त्यांच्या दृकश्राव्य संदेशातून लगावला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देशातील रिकामटेकड्या लोकनेत्यांच्या यादीत नांव घेतले जाईल असाही लगावला टोला.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली असून त्यांना 'श्रेय घेणारे रिकामटेकडे लोकनेते' बनू नका असा सल्ला दिला आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव आणि वराड पुलाच्या पहाणीसाठी गेले असता आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी संबंधित ठेकेदाराला २० मे पर्यंत काम पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकायच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या त्याबबत माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी माध्यमांशी दृकश्राव्य संदेशातून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

ही वरील दोन्ही कामे २०१४ व २०१७ ला वर्क ऑर्डर अनुसार कार्यान्वित असताना म्हणजेच गेल्या ९ वर्षातील आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या कार्यकालातील असताना ती अजून पूर्ण झाली नव्हती. भाजपाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आपण स्वतः त्याबाबत २ महिन्यांपूर्वीच ठेकेदाराला 'त्याला समजेल अशा पद्धतीने ' काम पूर्ण करायला सांगितले होते व ते काम आता जवळपास ९० ते ९५% पूर्णत्वाकडे असून ही गोष्ट आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या लक्षात आल्यावर केवळ श्रेयवादासाठी काल वराड व अणाव येथे गेले असा आरोप माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी केला आहे.

आता गेली ८ ते ९ महिने राज्य सरकार सगळी कामे सक्षमपणे करत असून आतातरी आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांनी स्वतः काहीतरी सकारात्मक करावे अन्यथा देशातील रिकामटेकड्या लोकनेत्यांच्या यादीत त्यांचे नांव घेतले जाईल असा टोला देखिल माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी त्यांच्या दृकश्राव्य संदेशातून लगावला आहे.

error: Content is protected !!