माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी संबंधित विभाग व ग्रामपंचायत यांनी सखोल चौकशी करावी अशी केली मागणी.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवात यंदा ‘पाणी अडवा …पाणी जिरवा’ वनराई बंधारे बांधण्यात सरपंच व ग्रामपंचायत यांना अपयश आल्यामुळेच पळसंब गांवातील व्हाळातील आणि विहिरीची पाणी पातळी खालावली आहे असे प्रतिपादन माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी संदेशाद्वारा केले आहे.
पाणी पातळी तथा भूजल स्तर गेलीली असतानाच
पळसंब बांधावरील व्हाळातील पाण्याच्या स्त्रोतात जे सी बी च्या सहहाय्याने खडडा मारून पाण्याचा स्त्रोत्र अडवून व्हाळा मध्ये खड्यातून निघालेले दगद टाकून पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न श्री .सुधिर माने व अरुण माने यांनी करून ते पाणी पंप लावून आपल्या बागेत झाडांना सोडले असून गावातील शेतकरी व श्री . दिपक मुंडले ( निगुडकर ) यांच्या प्लॉट मधुन जेसिबी च्या सहाय्याने झाडांची नासधुस करत रस्ता बनवून ग्रामस्थांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न याच्या कडून करण्यात येत असल्याचा आरोप चंद्रकांत गोलतकर यांनी केला आहे.
यासर्व घटकांना कोणाचा पांठिबा आहे त्याचा शोध ग्रामपंचायत व संबधीत विभागाने घेवून सखोल चौकशी करून ग्रामस्थांना न्याय द्यावा हि विनंती मा सरपंच श्री . चंद्रकांत गोलतकर यांनी प्रसिद्धी संदेशातून व्यक्त केली आहे .