बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाफोली देऊळवाडी येथे आज दुपारी शॉर्ट सर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर (डीपी) जळून खाक झाला. ट्रान्सफॉर्मरच्या सभोवती गवत असल्याने शाँर्ट सर्किट होऊन आगीची ठिणगी गवतावर पडल्याने आग लागली. गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे. येथील स्थानिक नागरिकांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागण्याची दिड ते दोन महिन्यात ही दुसरी वेळ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महावितरणच्या कंपनीच्या या हलगर्जी पणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

डि.पी स्वीचचा बॉक्स लोखंडी बसवण्याची विनंती करूनही प्लास्टिक (फायबर)ची बसविली जाते. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने लगेचच आग पेट घेते. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करावी अशी येथील नाराज ग्रामस्थांची मागणी आहे.