विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून आचरा जिल्हा परिषद मतदार संघात ( चिंदर ) आज विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
चिंदर पावणाई मंदिर रस्ता खडीकरण अंतर्गत डांबरीकरण व भूमीपूजन जेष्ठ नागरीक दशरथ पडवळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचातयत सदस्य शशीकांत नाटेकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, अजित नार्वैकर, रुपेश पडवळ, मोहन चिंदरकर, दिशांत पडवळ, केशव पडवळ, यशवंत नार्वेकर, मारुती आपकर, मोरेश्वर गोसावी, मयुर आपकर, बाळा पारकर, समिर अपराज,रणजित दत्तदास आदी उपस्थित होते.
जल जीवन मिशन नळपाणी योजना गावडेवाडी अतंर्गत चिंदर गावडेवाडी नळपाणी योजनेचे भूमीपूजन प्रतिष्ठित व्यक्ती शंकर गांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर-महेंद्र मांजरेकर, मंगेश गांवकर, शिवराम गांवकर, छगन गांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, विश्राम माळगांवकर, ममता गावकर, वैशाली गांवकर आदी महिला उपस्थित होत्या.
माधववाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण या प्रकल्पातील माधववाडी रस्त्याचे भूमी पूजन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सुबोध गावकर, बाळा पाताडे, समिर अपराज, विश्राम माळगांवकर उपस्थित होते.