सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाची माहिती…..
ओरोस | प्रतिनिधी : उत्सव उत्साहाचेच सध्या वातावरण जरी असले तरिही कोरोना लसीकरणाची गरज प्रशासनाने प्राधान्याने ओळखत लसीकरणावर भर दिला आहे.कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 81 हजार 811 नागरिकांनी पहिला डोस घेतला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 31 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 916 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 656 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षांवरील 1 लाख 20 हजार 229 व्यक्तींनी पहिला डोस तर 79 हजार 841 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 42 हजार 242 नागरिकांनी पहिला डोस तर 88 हजार 504 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 लाख 99 हजार 589 जणांनी पहिला डोस तर 69 हजार 101 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. अशा एकूण 7 लाख 35 हजार 944 लसी देण्यात आल्या आहेत.जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 7 लाख 25 हजार 720 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 5 लाख 51 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 1 लाख 74 हजार 240 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 5 लाख 69 हजार 599 कोविशिल्ड आणि 1 लाख 66 हजार 345 कोवॅक्सिन असे मिळून 7 लाख 35 हजार 944 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 35 हजार 540 लसी उपलब्ध असून त्यापैकी 23 हजार 150 कोविशिल्डच्या आणि 12 हजार 390 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 900 लसी शिल्लक असून त्यापैकी 450 कोविशिल्ड आणि 450 कोवॅक्सीनच्या लसी आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
.