बांदा | राकेश परब (विशेष ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोणापाल येथे एक अनोख्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण काल पहायला मिळाले. ‘रक्तदान हेच जीवनदान’ या प्रमाणेच आपल्यावर व कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद प्रसंगिही आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने रोणापाल येथील श्री नारायण नाईक या युवकाने रक्तदान केले. जन्मदात्री आईचे दोन दिवसापूर्वी निधन झाले असे असूनही समाजात एक नवा आदर्श देत नारायण नाईक यांनी आजच्या रोणापाल येथील प्रकाश गावडे मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरात येत रक्तदान केले.
दोन दिवसांपूर्वी श्री.नारायण नाईक यांच्या आईचे निधन झाले होते. एकीकडे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या नारायण नाईक व कुटुंबातील सिद्धेश नाईक, कल्पेश नाईक, प्रथमेश नाईक सदस्यांनी सुद्धा शिबिरात रक्तदान केले. यामध्ये सिद्धेश नाईक प्रथमेश नाईक कल्पेश नाईक यांच्या त्या काकी होत्या. नारायण नाईक यांच्या आईचे निधन झाले आणि नाईक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता तरी अशाच परिस्थितीमध्ये समाजामध्ये एक नवा आदर्श देत या नाईक कुटुंबातील सर्व सदस्यांनी या शिबिरामध्ये येत रक्तदान केले . रक्तदान केल्याने एखाद्या आजारी व्यक्तीला जीवनदान मिळत असते हे त्यांनी जाणले. या कुटुंबीयांची मंडळाकडून प्रशंसा करण्यात आली आहे .