मालवणचे माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी केले ‘आधार पॅन लिंक तपासणी’ शिबिराचा लाभ घ्यायचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात मनसे तर्फे आधार पॅन लिंक करणे ही आजची सर्वसामान्य नागरीकाची अत्यावश्यक ओळख आहे हे जाणत ‘आपले आधार पॅन लिंक आहे की नाही या तपासणी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या २ एप्रिलला मालवण पंचायत समितीच्या शेजारी ‘हाॅटेल विशाल’ येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या दरम्यान हे शिबिर संपन्न होणार आहे.
सर्वसामान्य नागरीक व खासकरुन ग्रामीण क्षेत्रातील कष्टकरी बंधू भगिनींना ‘आधार पॅन लिंक करणे किंवा आधारला पॅन लिंक आहे की नाही’ याची विशेष कल्पना नसते आणि बहुतांश वेळी जेंव्हा ते तपासायची वेळ येते तेंव्हा त्यासाठी काही ठराविक किंमत मोजावी लागते हे ध्यानात घेऊन ‘हे आधार पॅन लिंक तपासणे’ शिबीर आयोजीत करायचे मनसे तर्फे ठरवले आहे अशी माहिती मनसे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी माध्यमांना दिली आहे. उद्या २ एप्रिलला याचा जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असेही त्यांनी शहर मनसे तर्फे सांगितले आहे.