23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ओरोसच्या शरद कृषी भवनात ७ मे रोजी ‘सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे’ आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

सामाजिक कार्यकर्ते व सोहळा समिती अध्यक्ष ॲड.नकुल पार्सेकर यांनी इच्छुकांना केले नोंदणीचे आवाहन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसच्या कृषी भवनात ७ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि या सोहळा समितीचे अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी या विषयी माध्यमांद्वारे जाहीर नोंदणीचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ‘४१ क’ अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा सर्व धर्मीय विवाह सोहळा समीती सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती एम्. एस. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली असून धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ७ मे रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे करण्यात आले आहे. विशेषतः विवाह सोहळ्यासाठी जोडपी निवडताना आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची मुले, बेघर, पारधी समाज, अपंग, गरीब व गरजू तसेच मागासवर्गीय मुले व मुली या घटकांचा विचार केला जाणार आहे.

इच्छुक जोडप्यांचे आधारकार्ड, जन्मदाखला वा शाळा सोडल्याचा दाखला व ज्यांचे पालक हयात आहेत त्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे. या सामाजिक उपक्रमासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे तसेच मदत करु इच्छिणाऱ्यानी व इच्छुक जोडप्यांनी अधिक माहितीसाठी तथा पूर्व नोंदणीसाठी दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत समितीचे कार्यवाह श्री अशोक पाडावे (९८६९२८०५२९)आचरा, ॲड. सौ. पूर्वा ठाकूर, सहसचिव (९५४५४१५२२९)मालवण, खजिनदार श्री एल्. एम्. सावंत (९४०५१५३२५५)राजवाडा, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सामाजिक कार्यकर्ते व सोहळा समिती अध्यक्ष ॲड.नकुल पार्सेकर यांनी इच्छुकांना केले नोंदणीचे आवाहन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसच्या कृषी भवनात ७ मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि या सोहळा समितीचे अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी या विषयी माध्यमांद्वारे जाहीर नोंदणीचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम '४१ क' अन्वये सिंधुदुर्ग जिल्हा सर्व धर्मीय विवाह सोहळा समीती सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती एम्. एस. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली असून धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ७ मे रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे करण्यात आले आहे. विशेषतः विवाह सोहळ्यासाठी जोडपी निवडताना आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची मुले, बेघर, पारधी समाज, अपंग, गरीब व गरजू तसेच मागासवर्गीय मुले व मुली या घटकांचा विचार केला जाणार आहे.

इच्छुक जोडप्यांचे आधारकार्ड, जन्मदाखला वा शाळा सोडल्याचा दाखला व ज्यांचे पालक हयात आहेत त्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे. या सामाजिक उपक्रमासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे तसेच मदत करु इच्छिणाऱ्यानी व इच्छुक जोडप्यांनी अधिक माहितीसाठी तथा पूर्व नोंदणीसाठी दिनांक २० एप्रिल २०२३ पर्यंत समितीचे कार्यवाह श्री अशोक पाडावे (९८६९२८०५२९)आचरा, ॲड. सौ. पूर्वा ठाकूर, सहसचिव (९५४५४१५२२९)मालवण, खजिनदार श्री एल्. एम्. सावंत (९४०५१५३२५५)राजवाडा, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!