23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणात मत्स्य जयंती भव्य स्वरुपात झाली साजरी ; गाबित समाज व धुरीवाड्यातील श्रीकृष्ण मंदिराचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित (मुख्य संपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथे आज मत्स्य जयंती भव्य स्वरुपात झाली साजरी झाली.

हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे. चैत्र शुक्ल तृतीया या तिथीला ही मत्स्य जयंती साजरी केली जाते. मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक आणि खासकरुन मच्छिमार बांधव भगवान श्री विष्णूंच्या या मत्स्य स्वरुपाची भक्ती समर्पणाने करतात. देशभरातील भगवान विष्णू मंदिरात हा सण विविध पद्धतीने साजरा करतात.

आज श्रीकृष्ण मंदिर, धुरीवाडा येथे मत्स्य रुपी विष्णू देवाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून मत्स्य जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पारंपरिक मच्छीमार व श्रीकृष्ण मंदिर अध्यक्ष श्री दत्ता केळुसकर यांनी मत्स्य रुपी विष्णू प्रतिमेचे पूजन केले. मत्स्य व्यवसाय समोर असलेली आव्हाने व विघ्ने दूर करून सागर साधन संपत्ती चा शाश्वत वापर करण्याची सन्मती माणसाला द्यावी असे साकडे मत्स्यरूपी विष्णू देवाला घालण्यात आले.

गाबित समाज,श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा -मालवण व सागरी सुरक्षा मंच च्या वतीने आयोजित केलेल्या मत्स्य जयंती कार्यक्रमास गावित समाज सिंधुदुर्ग च्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवला व मत्स्य जयंती साजरी केली .यावेळी अखिल भारतीय गाबित समाज संघाचे अध्यक्ष श्री परशुराम ऊर्फ जी.जी. उपरकर , सिंधुदुर्ग गाबित जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रशेखर उपरकर श्री.हरी खोबरेकर , श्री. पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी , सन्मेश परब, दिलीप घारे,सौ. सेजल परब ,सौ.मेघा गांवकर, सौ.चारू आचरेकर श्री.किरण कुबल,श्री.संजय बांदकर, डॉक्टर प्रमोद कोळंबकर ,सौ.स्वाती कुबल ,श्री.आंड जामसंडेकर , श्री दीपक तारी, ॲड. संदीप चांदेकर उपस्थित होते.

मत्स्य जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वसंत गांवकर श्री पणशीकर ,श्री भाऊ सामंत, श्री विलास हडकर व धुरीवाडा ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. गाबित समाज संघटक श्री.रविकिरण तोरसकर यांनी याविषयी माध्यमांना विस्तृतपणे विवेचन संदेश प्रसारीत केला.
भविष्यात सिंधुदुर्गातील प्रत्येक मच्छिमार गावांमध्ये मत्स्य जयंती साजरी करण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!