24.6 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अरे ही आहे कोण माझी ..? (हास्यजत्रा स्वास्थ्यजत्रा :भाग : १ )

- Advertisement -
- Advertisement -

सिनेपट | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम आणि त्यातील काही भाग यांवर आपली ही नवीन लेखन मालिका आपण सुरु करत आहोत.

आज पहिल्याच भागात आपण हास्यजत्रेतील ‘मोलकरीण’ या सिरीजच्या एका भागाबद्दल जाणुन घेऊया.

पंडित सुमारीया चौघुले म्हणजेच सर्वांचे लाडके लेखक व अभिनेते समीर चौघुले आणि त्यांची मोलकरीण शेवंता म्हणजे जिच्या प्रतिभेला नाही ठाव अशी अभिनेत्री नम्रता संभेराव यांची ही सिरीज…’मोलकरीण..!’

पंडित सुमारीया चौघुले यांना गायनाची प्रचंड आवड असते. आपल्या घरात २४ तास रियाज़ करायची सवय असलेल्या सुमारीयांना कधीमधी काही गायनाचे कार्यक्रम मिळतात पण प्रत्येक वेळी अरसिक श्रोतेच त्यांच्या ‘गान पदरी’ पडत असतात..त्यामुळे शास्त्रीय संगिताचा आग्रह धरणार्या पंडित सुमारीया चौघुले यांना फारसे अर्थार्जन वगैरे नसते. ते अविवाहित देखील असल्याने त्यांना फारसे खर्च नसतात. त्यांच्या घरी शेवंता नावाची मोलकरीण हीच त्यांना एकमेव अंतर्बाह्य ओळखणारी ‘माणुस’ असते. शेवंताचा पती संपूर्ण दारुडा असूनही तिची कामावर निष्ठा आणि सुसंस्कृतपणाची झालर तिला असते. फक्त पंडित सुमारीया चौघुले यांच्या गायन रियाज़ाचा तिच्या कामाच्या वेळेत व्यत्यय आला तर ती वैतागत असते…पण ती त्यातूनही कधी तिची कामे टाळत नसते.

एकदा शेवंताला १० दिवस तिच्या सुनंदा नावाच्या नणंदेच्या लग्नासाठी रजा हवी असते पण त्यासाठी ती एका पर्यायी मोलकरीणीला घेऊन येते. सुमारीया चौघुले आणि शेवंताची रोज नोक झोक होत असतेच शिवाय सुमारीया चौघुले तिला पगार वगैरेही वेळेत देत नसतो तरिही तो ‘मी मालक आहे’ असे अनेक वेळा तिला ऐकवतो आणि शेवंता नेहमी ‘हे घर माझे सुद्वा आहे’ असे ठणकावून त्याला ऐकवत असते. आता या वेळी शेवंता नवीन मोलकरीणीला सगळं समजावून सांगत असते तेंव्हा सुमारीया तिला मधून मधून सारखे टोमणे मारत असतो.

सगळं समजावून सांगितल्यावर शेवंता जायला निघते तेंव्हा ती एक डबा भरुन चिवडा आणि लाडूचा एक डबा सुमारीयाच्या हातात देते आणि बजावते की पुढील १० दिवसांत हे सगळं संपलंच पाहिजे. चिवड्यातले फक्त शेंगदाणे व खोबरं आणि लाडूवरचे फक्त बेदाणे खाल्ले तर याद राखायची. शेवटी जाता जाता ती दारातून पुन्हा मागे येते आणि सुमारियाला विचारते की ब्लड प्रेशरची गोळी घेतली का…आणि ती गोळी रोज आठवणीने द्यायची तंबी नवीन मोलकरीणीला देते….!

ब्बास…! इथेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ काय व कोणत्या श्रेणीतील अनुभूती आहे याची प्रचिती येते. एरवी शेवंताशी धडाधडा भांडणारा सुमारीया चौघुले म्हणजेच समीर चौघुले म्हणतो,” अरे….ही आहे कोण माझी..? नातं काय हिचं माझ्याशी? ही आई आहे का माझी..? माझी इतकी कशाला काळजी करते इतकी..? मी हिला पगारही फारसा देत नाही आणि वेळेवर तर नाहीच नाही..!”
या प्रसंगा दरम्यान संपूर्ण स्किटभर हसलेला प्रत्येक प्रेक्षकाला समीर चौघुले हा ‘द ग्रेट समीर चौघुले का आहे…’ याची प्रचिती येते असाच हा प्रसंग आणि नम्रताच्या प्रतिभेचा का ठाव लागत नाही असा तिचा वावर..! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टेन्शनवरची मात्रा असेलही परंतु ती स्वास्थ्यजत्रा नक्कीच आहे हा संदेश नकळत पोचणारा हा एपिसोड.

समीर चौघुले आणि नम्रता संभेराव यांनी अभिनय वगैरे करणे कधीच सोडून दिले आहे…ते आता थेट कलेसकट ‘जगतात…सहजपणे..!’

सिनेपट | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिनेपट | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम आणि त्यातील काही भाग यांवर आपली ही नवीन लेखन मालिका आपण सुरु करत आहोत.

आज पहिल्याच भागात आपण हास्यजत्रेतील 'मोलकरीण' या सिरीजच्या एका भागाबद्दल जाणुन घेऊया.

पंडित सुमारीया चौघुले म्हणजेच सर्वांचे लाडके लेखक व अभिनेते समीर चौघुले आणि त्यांची मोलकरीण शेवंता म्हणजे जिच्या प्रतिभेला नाही ठाव अशी अभिनेत्री नम्रता संभेराव यांची ही सिरीज…'मोलकरीण..!'

पंडित सुमारीया चौघुले यांना गायनाची प्रचंड आवड असते. आपल्या घरात २४ तास रियाज़ करायची सवय असलेल्या सुमारीयांना कधीमधी काही गायनाचे कार्यक्रम मिळतात पण प्रत्येक वेळी अरसिक श्रोतेच त्यांच्या 'गान पदरी' पडत असतात..त्यामुळे शास्त्रीय संगिताचा आग्रह धरणार्या पंडित सुमारीया चौघुले यांना फारसे अर्थार्जन वगैरे नसते. ते अविवाहित देखील असल्याने त्यांना फारसे खर्च नसतात. त्यांच्या घरी शेवंता नावाची मोलकरीण हीच त्यांना एकमेव अंतर्बाह्य ओळखणारी 'माणुस' असते. शेवंताचा पती संपूर्ण दारुडा असूनही तिची कामावर निष्ठा आणि सुसंस्कृतपणाची झालर तिला असते. फक्त पंडित सुमारीया चौघुले यांच्या गायन रियाज़ाचा तिच्या कामाच्या वेळेत व्यत्यय आला तर ती वैतागत असते…पण ती त्यातूनही कधी तिची कामे टाळत नसते.

एकदा शेवंताला १० दिवस तिच्या सुनंदा नावाच्या नणंदेच्या लग्नासाठी रजा हवी असते पण त्यासाठी ती एका पर्यायी मोलकरीणीला घेऊन येते. सुमारीया चौघुले आणि शेवंताची रोज नोक झोक होत असतेच शिवाय सुमारीया चौघुले तिला पगार वगैरेही वेळेत देत नसतो तरिही तो 'मी मालक आहे' असे अनेक वेळा तिला ऐकवतो आणि शेवंता नेहमी 'हे घर माझे सुद्वा आहे' असे ठणकावून त्याला ऐकवत असते. आता या वेळी शेवंता नवीन मोलकरीणीला सगळं समजावून सांगत असते तेंव्हा सुमारीया तिला मधून मधून सारखे टोमणे मारत असतो.

सगळं समजावून सांगितल्यावर शेवंता जायला निघते तेंव्हा ती एक डबा भरुन चिवडा आणि लाडूचा एक डबा सुमारीयाच्या हातात देते आणि बजावते की पुढील १० दिवसांत हे सगळं संपलंच पाहिजे. चिवड्यातले फक्त शेंगदाणे व खोबरं आणि लाडूवरचे फक्त बेदाणे खाल्ले तर याद राखायची. शेवटी जाता जाता ती दारातून पुन्हा मागे येते आणि सुमारियाला विचारते की ब्लड प्रेशरची गोळी घेतली का…आणि ती गोळी रोज आठवणीने द्यायची तंबी नवीन मोलकरीणीला देते….!

ब्बास…! इथेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' काय व कोणत्या श्रेणीतील अनुभूती आहे याची प्रचिती येते. एरवी शेवंताशी धडाधडा भांडणारा सुमारीया चौघुले म्हणजेच समीर चौघुले म्हणतो," अरे….ही आहे कोण माझी..? नातं काय हिचं माझ्याशी? ही आई आहे का माझी..? माझी इतकी कशाला काळजी करते इतकी..? मी हिला पगारही फारसा देत नाही आणि वेळेवर तर नाहीच नाही..!"
या प्रसंगा दरम्यान संपूर्ण स्किटभर हसलेला प्रत्येक प्रेक्षकाला समीर चौघुले हा 'द ग्रेट समीर चौघुले का आहे…' याची प्रचिती येते असाच हा प्रसंग आणि नम्रताच्या प्रतिभेचा का ठाव लागत नाही असा तिचा वावर..! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टेन्शनवरची मात्रा असेलही परंतु ती स्वास्थ्यजत्रा नक्कीच आहे हा संदेश नकळत पोचणारा हा एपिसोड.

समीर चौघुले आणि नम्रता संभेराव यांनी अभिनय वगैरे करणे कधीच सोडून दिले आहे…ते आता थेट कलेसकट 'जगतात…सहजपणे..!'

सिनेपट | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल

error: Content is protected !!