अपूर्णांक व दशांश अपूर्णांक ऑलिम्पिक 2022 – 23अल्केमी कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा उपक्रम
विवेक परब-ब्यूरो चिफ- अल्केमी कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आर्थिक साहाय्यातून गणित अध्ययन संस्था गणित विषयक ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करीत असते. इयत्ता पाचवीच्या वर्गाची ऑलिम्पिक कणकवली नं.३ शाळेत नुकतीच संपन्न झाली. त्यात शिडवणे नं.१ शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
त्यामध्ये वेदांत कुडतरकर, श्रेया पाळेकर, सुशांत गुंडये, फरान शेख, केतन सुतार, सार्थक धुमाळ, सर्वेश पाष्टे, हर्षद रांबाडे या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. तालुकास्तरीय संपन्न झालेल्या गणित ऑलिम्पिकमध्ये शिडवणे नं. १ शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. याबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले आहे. पाचवीच्या वर्गशिक्षिका सुजाता प्रल्हाद कुडतरकर आणि पाचवीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुनिल तांबेसर यांनी विशेष अभिनंदन केले आहे. गणित अध्ययन संस्थेच्या या उपक्रमाबद्दल शिडवणे नं.१ शाळेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत.