सरपंच सुभाष लाड यांची माहिती.
मसुरे | प्रतिनिधी : आदर्श गांव योजने अंतर्गत गोळवण गावची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार गावात ६ मार्च रोजी विशेष ग्रामसभा घेऊन परिसरांची पाहणी करण्यात आली. या सभेत व परिसर पाहणीनुसार शासन निर्णयातील गाव व संस्था निवडीचे निकष, लोकसहभाग, संस्थेची तांत्रिक क्षमता, पाणलोट कामात असलेली प्रगती, ग्राम ‘अभियानात असलेले सातत्य, संस्था व ग्रामस्थांचा समन्वय आदी निकषानुसार कागदपत्रांची पाहणी करून कार्यकारी सभेत झालेल्या निर्णयानुसार गोळवण गावाची व गावाच्या सहकार्यासाठी ग्रामसभेने निवडलेल्या श्री रामेश्वर कृषी युवा मंडळ, भिरवंडे (ता. कणकवली) यांची प्राथमिक निवड जाहीर करण्यात आली.
याबाबत आदर्श गांव संकल्प आणि प्रकल्प समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आदर्श गाव जिल्हा समितीच्या अध्यक्षा तथा . जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना पत्र दिल्याची माहिती गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी दिली.