विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंडवळी ग्रामपंचायत व एस्. एस्. पी. एम. लाईफटाईम हाॅस्पिटल-पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने तोंडवळी ग्रामपंचायत येथे आज सोमवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात तोंडवळी मधील गरजू रुग्ण सहभागी झाले होते. ५० जणांची या शिबिरात मोफत तपासणी झाली. या शिबिराची सुरुवात तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर यांचा हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
एस्. एस्. पी. एम. लाईफटाईम हाँस्पिटल, पडवेचे डॉ. चिन्मय प्रभू, डॉ.संजय जोशी, कोमल सावंत, शिवानी राऊळ, डी, व्ही,धोत्रे या सारख्या तज्ञ डॉक्टराच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली.
या शिबिरात, मोफत हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तपासणी, इ.सी.जी, बी.एस.एल, नेत्र तपासणी, बोन डीसीज, अस्थीरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा यांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. या मोफत शिबिराला विकास लुडबे, विष्णू गोसावी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी तोंडवळी उपसरपंच हर्षद पाटील, तोंडवळी ग्रामसेवक प्रकाश सुतार, ग्रामपंचायत सदस्या मानसी चव्हाण, अनन्या पाटील, सुजाता पाटील, नरेंद्र मेस्त, राजा पेडणेकर, अनिल वायंगणकर, प्रमोद पाटील, प्रणिता पेडणेकर, रमेश पाटील, निलेश तोंडवळकर, महेश नाईक, दिशा गोलतकर, श्रद्धा पाटील, दीपक पेडणेकर, अशोक पेडणेकर, रुपेश पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.