विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे देऊळवाडा येथे जागतीक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. पूर्ण प्राथमिक शाळेपासून माऊली मंदिर, भरतेश्वर मंदिर ते वेतोबा मंदिर पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत शालेय विद्यार्थी, महिला तसेच देऊळवाडा ग्रामपंचायत सरपंच, सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. देऊळवाडा ग्रामपंचायत व स्थानिक महिलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमातचे अध्यक्षपद रजनीताई जोशी (आचरा-पोयरे) यांनी भूषवले. अध्यक्षीय भाषणात जोशी यांनी ‘शेती व रोजगाराच्या वाटा व संधी’ यांवर उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर आरोग्य विषयक मार्गदर्शना करताना महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या योग शिक्षक खाडीलकर, तोरस्कर, कोचरेकर यांनी शारीरिक व्याधीनुसार सर्वाना उपयुक्त योगप्रकार, प्राणायम तसेच औषध यांचे प्रात्यक्षिक दाखवत उत्तम असे मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात उत्तम भोजनाचा आस्वाद घेतल्यावर सत्रातील पुढील कार्यक्रमात शालेय विद्यार्थी(छोटा गट) व महिला(मोठा गट) यांनी अनेक रेकॉर्ड डान्स सादर केले. त्यानंतर सादर झालेल्या गीतगायन कार्यक्रमात ग्रामस्थ महिलांनी भक्तिगीते, भावगीते, नाट्यसंगीत गायन सादर केले. त्यांना संगीत साथ शिवा मेस्त्री व सुरेश घाडी यांनी केली. तसेच छोट्या दोस्तानी जिजाऊ व महिला दिनावर उस्फूर्तपणे भाषणे केली. संध्याकाळी “होममिनिस्टर”हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम पुण्याच्या सौ.वैशाली गायकवाड, सौ.सुजाता गायकवाड यांनी संचलित केला. यामध्ये छोट्या मोठया खेळांसमवेत कॅटवॉक, फॅशन शो मध्ये महिला व युवती यांनी सादरीकरण केले .
या संपूर्ण कार्यक्रमात देऊळवाड्यातील सर्व लहान थोर सर्व ग्रामस्थ महिला, पुरुष, युवक, युवती, विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी योगदान दिले.
देऊळवाडा मसुरे गावात महिला दिनाचे हे चौथे वर्ष आहे. साजरे करण्यामागे ग्रामस्थ महिलांना एक दिवस तरी स्वतःसाठी वेळ देत रोजच्या प्रचंड मेहनतीच्या शेतीवाडीच्या कामातून मुक्त होत अशा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटता यावा, त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील गुणकौशल्याना वाव मिळावा, त्या आत्मनिर्भर व्हाव्यात व त्यांना स्वतःची ओळख निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी तसेच महिला पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष सौ.दीपश्री खाडीलकर, सौ तृप्ती तोरस्कर (संघटनमंत्री), प्रिया कोचरेकर (संपर्क प्रमुख) तसेच प्रमुख अतिथी मान.फातिमा सिस्टर, देऊळवाडा, ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र सावंत, अशोक मसुरकर(सदस्य), चंद्रकांत राणे(सदस्य), मीनल तांबे( सदस्य), सौ.मनीषा बागवे, सौ. साधना चौगुले(सदस्य), सौ.वर्षाराणी बलवंत अभ्यंकर(कार्यक्रमाच्या संयोजिका व ग्रामपंचायत सदस्य), तसेच प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.पारकर सर, डोळस सर, सापळे मॅडम, डोळस मॅडम, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण परब, श्री. विलास मेस्त्री, बांधकाम व्यावसायिक व समाज कार्यकर्ते श्री.महेश बागवे, महिला प्रतिनिधी सौ.जयमाला भोगले, मनाली फाटक. शालेय समिती अध्यक्ष श्री. विठ्ठल लाकम, ग्रामसेवक सुनील माळगावकर, प्रकाश परब, प्रसाद परब श्री. अनिल सावंत, प्रमोद सावंत, सागर बागवे, मोहन आमडोस्कर, प्रदीप बागवे, सदानंद परब, विजय परब,रमेश परब, किशोर परब, समीर परब, समीर बागवे, बापूजी बागवे, ग्रामपंचायत कर्मचारी तेजस परब, गणेश सांडव, कु.तन्वी लाड व रंजना बागवे, गीतेश्री मसुरकर, संपदा बागवे, प्रज्ञा बागवे, सिमरन बागवे, समीक्षा बागवे, सानिका बागवे, सौ.अर्चना कोदे, छाया बागवे, मनीषा बागवे, अश्विनी परब, राजशी घाडीगांवकर, रंजना मुळ्ये, सुनीता परब, जयमाला भोगले, नम्रता बागवे, प्रमिला बागवे, मारिया लोबो, दीपाली बागवे, बाबू मुळ्ये, सुरेश बागवे, वर्षा परब, ज्योती परब, सुरेखा परब, रुक्मिणी परब, प्रिया बागवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. वर्षाराणी अभ्यंकर, प्रज्ञा परब, विद्या लाकम यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांनी केले .