आमदार नितेश राणे यांनी केले सर्वांचे स्वागत.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
देवगड तालुक्यातील चाफेड गांवचे ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन उर्फ नागेश आकाराम साळकर आणि ग्रामपंचायत सदस्या सौ. राधिका राकेश ठुकरुल यांच्यासह संपूर्ण बादेवाडीतील ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित भाजप पक्षात जाहीररीत्या प्रवेश केला.यावेळी आमदार नितेश राणे यांनी या सर्वांचे स्वागत करून या वाडीतील विकासकामे अपूर्ण राहिली आहेत ती पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले की कणकवली, देवगड, वैभववाडी या माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी राज्य शासनाने २ हजार २१० कोटीचा निधी दिला असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन विकासकामे सुरू होतील. या निधीमध्ये केवळ रस्त्यांच्या कामासाठी २३८ कोटी मंजूर आहेत. त्यामुळे जसा चाफेड गावातील बादेवाडीतील ग्रामस्थांनी माझ्यावर, आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेऊन भाजप पक्षात प्रवेश केला तसा सरपंच आणि गावातील अन्य वाडीतील लोकांनी याचा जरूर विचार करावा.संपूर्ण गाव भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले तरच गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. सरपंच, आमदार, खासदार एकाच पक्षाचे असतील तर विकासकामे जलदगतीने पूर्ण होऊ शकतात. विकास हा भाजपच करू शकतो. अन्य कुठलाही पक्ष नाही.त्यामुळे हे विश्वासाचे नाते असेच आमच्या पाठीशी, पक्षाशी घट्ट ठेवा. विकासाची जबाबदारी माझी आहे. श्री. भैरी ठाणेश्वर भावई मंदिराच्या सभामंडपाचे काम, रस्त्याचे काम, स्मशानशेड चे काम ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन उर्फ नागेश साळकर यांनी साळकरवाडी कडे जाणारा ५०० मी. रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण होण्यासाठी आमदारांना लेखी निवेदन दिले असता सदरचे काम लवकरच सुरू होईल असे सांगितले. संतोष पवार यांनी विविध विकासकामांची लेखी निवेदने आमदार यांना दिली. यावेळी भाजपा चे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम यांनी सांगितले की सर्वांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. संपर्कात रहा. विकासकामांचा निधी कधीच कमी पडणार नाही.
यावेळी बादेवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, माजी जि.प. सदस्य सुभाष नार्वेकर, चाफेडचे माजी सरपंच सत्यवान भोगले, शिरगांव – शेवरे ग्रूप ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमित साटम, राजेंद्र शेट्ये, पं. स. सदस्य गणेश तांबे, माजी सरपंच संतोष साळसकर, ग्रा.प.सदस्य सुनील कांडर, सुदर्शन उर्फ नागेश साळकर, ग्रा. प. सदस्या सौ. राधिका ठुकरुल, माजी उपसरपंच सुनील धुरी, वसंत पवार, संतोष ठुकरुल, रमेश पवार, संतोष पवार, विशाल राणे आदींसह बादेवाडीतील संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रकाश कदम यांनी मानले.