दिल्ली | ब्यूरो न्यूज : ‘H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसचा’ धोका वाढल्याने देशात पुन्हा एकदा मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असा सावधगिरीचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरल्यास किंवा मास्क काढल्यास तुम्हाला इन्फ्लुएन्झाचा धोका आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक पुन्हा एकदा वाढ झालीय. तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे व तशी अधिकृत सूचना लवकरच सर्व राज्य सरकारना दिली जायची शक्यता आहे.