सहसंपादक/नवलराज काळे- पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला आहे. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झाला. त्यांना ३७ व्या फेरीनंतर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाले. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली. या निवडणुकीवर अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.अश्विनी जगताप म्हणाल्या, ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला, पण सिंह गेला. लक्ष्मण जगताप यांचं निधन झाले, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे.*मी हा विजय लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते*माझा सुरुवातीपासून सर्वांवर विश्वास होता. मी हा विजय लक्ष्मण जगताप आणि सर्व सामान्य नागरिकांना समर्पित करते. माझे वरिष्ठ नेते जेव्हा सांगतील तेव्हा मी अधिवेशनालाही येणार आहे. मी सर्वसामान्यांचा आमदार म्हणून काम करेन. सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले असतील,असे मत अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप विजयी
34
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -