जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १चे आयोजन
ब्यूरो चिफ/ विवेक परब : मालवण तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून “महिला दिन करंडक जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे ८ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे प्रथम वर्ष असून स्पर्धेचे विषय-१) आजची स्त्री आत्मनिर्भर स्त्री, २) महिला अत्याचार कारणे व उपाय,३) स्त्री स्वातंत्र्य? की, स्वैराचार,४) खरचं! स्त्री पुरूष समानता आहे का ??,५) स्त्रीचे कुटुंबातील स्थान आहेत, असे आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला-१५०१ रु व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला-१००१रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकला-७०१रु, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे नियमात-प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी वेळ ६ + १७ मिनिटे, स्पर्धेचे माध्यम मराठी, स्पर्धकाचे वय १४ ते २२ वर्ष, स्पर्धा प्रवेश निशुल्क आहे. पहिल्या प्रवेश नोंदविणाऱ्या २० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कोणत्याही क्रमांकाचे पारितोषिक विभागून दिले जाणार नाही, सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनोद कदम सर- ९४०४९२९९३६, श्रीम. योगिता कदम-९४२२७४४५७९, मानसी असरोंडकर-९४२१६५८००४ यांच्याशी ४ मार्च २०२३ पर्यंत संपर्क करावा. तसेच स्पर्धकांनसाठी भोजनाची व्यवस्था असणार आहे तरी स्पर्धकांनी लवकर आपली नावे नोंदणी करावी असे आवाहन, शाळा व्यवस्थापन समिती पळसंब नं. १ यांनी केले आहे.