26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आपण नक्की कुठे चाललो आहोत..?

- Advertisement -
- Advertisement -

सिंधू निरामय

(लेखक डाॅ.प्रज्ञावंत देवळेकर.)

आरोग्य विशेष : शहारुख खानच्या पोराचं सोडा कारण हीच घटना त्याच्या करिअरसाठी लाॅंचपॅडही ठरु शकेल..!
तुम्ही तुमच्या घरातल्या-आजूबाजूच्या मुलांशी यावर बोला आणि यावर त्यांची प्रतिक्रिया बघा..

‘लिया माल,व्हाट्स दी बीग डिल?क्रुझपे वो क्या चाय पिने जायेंगा क्या?’ असं मध्यमवर्गीय घरातले आणि आर्यनपेक्षाही लहानं पोरं पटकन बोलतात किंवा फक्त सुचक हसतात..
हे सगळं “आपण नक्की कुठं चाललं आहोत?” असा प्रश्न नक्की निर्माण करतं..
वाईट याचं वाटलं की ‘त्यानं’ व्यसन करणं म्हणजे फक्त ‘सरड्याची धाव शेवटी कुंपणापर्यंत’ ठरलं..!

इतकी सोपी व्याख्या मौजेची आणि नशेची? जी आहे बापाचा पैसा म्हणून विकत मिळते..

अडकवला कॅमेरा गळ्यात-धुंडाळलं जंगल-शोधली खेकड्याची नवीन प्रजाती..याला म्हणतात ‘कैफ’..!

आर्यनची ‘बातमी’ झाली पण अगदी त्याच्याहून लहान शाळकरी मुलं कोणकोणत्या व्यसनात अडकली नाहीयेत हे विचारा..
व्हाईटनर ही अगदी पहिली पायरी..!

माझ्या एका शाळकरी पेशंटनं गावाहून येतांना बस डोक्यावर घेतली कारण काय तर त्याला पेट्रोल हुंगायचं व्यसन होतं..
ड्रायव्हरला विनंती करत कसंबसं पेट्रोलपंपावर गाडी थांबवली आणि त्याच्या पालकांनी वीस रुपयात रुमाल पेट्रोलनं भिजवून घेतला आणि कसंबसं पुण्यापर्यंत आले..

मुळात संप्रेरकांमुळं या वयात व्यसनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते..
सुरुवातीला सहज गंमत म्हणून मुलं या व्यसनांकडं वळतात आणि नंतर ते व्यसन त्यांची गरज होते..

मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एकदा का व्यसन लागलं की ७० ते ९० टक्के व्यक्ती ते सोडण्यास तयार नसतात..

निकोटिनशिवाय एमडी व मॅफ्रेडॉनसारख्या अमली पदार्थाच्याही विळख्यात तरुणाई सोबत आता शाळकरी विद्यार्थीही अडकलेत..

जेलच्या ‘आत-बाहेर’ होणारे काही पेडलर्स माझे पेशंट आहेत..
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बुक’ या नावानं विद्यार्थ्यांमध्ये एक पावडर प्रसिद्ध आहे आणि याच वयोगटात केटामाईन, मॅजिक मशरूम यासारख्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे..

अगदी शाळकरी वयातली मुलं काय काय व्यसन करतात हे बर्‍याच जणांना सांगूनही पटणार नाही..

ग्लू-पेंट-ड्रायक्लिनिंगचं केमिकल-बॉण्ड-आयोडेक्स-स्टिकफास्ट-फेविक्विक-गॅसोलिन-हेअरस्प्रे-डिओड्रंट-थिनर-नेलपेन्ट रिमूव्हर-आयोडेक्स-पर्मनंट मार्कर-कोरेक्स आणि काय नाही? यात आता मुलीही मागं नाहीत..

बरं हे पदार्थ घेण्याच्याही वेगवेगळ्या अभिनव पद्धती आहेत..
▪️’डायरेक्ट अ‍ॅप्लिकेशन’ म्हणजे थेट नाकात किंवा तोंडात उडवणं,बोटाला किंवा शर्टाच्या कॉलरला लावणं,रुमालास लावून हुंगणं..

▪️’बॅगिंग’ म्हणजे कागद किंवा प्लास्टिकच्या पिशवीत तो पदार्थ उडवून त्यातून नाकाने आणि तोंडाने हवा आत घेणं..

▪️’हफिंग’ म्हणजे या पदार्थानं भिजवलेला कपड्याचा तुकडा तोंडात ठेवणं..

▪️’स्निफिंग’ म्हणजे तो पदार्थ ज्या कंटेनरमध्ये आहे त्याचा नाकानं वास घेणं..

जवळपास हजारो असे पदार्थ आहेत जे अश्या प्रकारे वापरले जातात..
या पदार्थात असणाऱ्या रसायनात ब्युटेन,क्लोरोफ्लूरो कार्बन यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो ज्यामुळं थेट मेंदूला ‘किक’पोहोचते..

तुमच्या संबंधित-आजूबाजूच्या शाळकरी मुलांच्या कपड्यांवर पेंट किंवा ऑईलचे डाग असतील,ते जवळ आल्यावर एखाद्या केमिकलचा वास येत असेल,त्यांच्या तोंडाच्या आजूबाजूला चट्टे किंवा जखमा असतील,नाकातनं वारंवार पाणी वहात असेल,डोळे लाल दिसत असतील,नजर भिरभिरती असेल,नखांवर डाग असतील,स्वभाव चिडचिडा असेल,बोलण्यात अडखळत असतील तर आधी त्यांचे मित्र कोण आहेत याचा तपास करा,त्यांना विश्वासात घ्या..
प्रारंभी मौज वाटली तरी या सगळ्याचा परिणाम प्रामुख्यानं हृदय-त्वचा-पचन संस्था-श्वसनसंस्था-किडनी यासोबतच मेंदूवरही होतो..

ब्रेकिंग न्यूजचं काय?आज आहे उद्या दुसरी येईल पण या पिढीचं काय?यावर साकल्यानं कुणी बोलणार नाही हे सगळं जाणवलं म्हणून हा प्रपंच !

(डॉ.प्रज्ञावंत देवळेकर.)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधू निरामय

(लेखक डाॅ.प्रज्ञावंत देवळेकर.)

आरोग्य विशेष : शहारुख खानच्या पोराचं सोडा कारण हीच घटना त्याच्या करिअरसाठी लाॅंचपॅडही ठरु शकेल..!
तुम्ही तुमच्या घरातल्या-आजूबाजूच्या मुलांशी यावर बोला आणि यावर त्यांची प्रतिक्रिया बघा..

‘लिया माल,व्हाट्स दी बीग डिल?क्रुझपे वो क्या चाय पिने जायेंगा क्या?’ असं मध्यमवर्गीय घरातले आणि आर्यनपेक्षाही लहानं पोरं पटकन बोलतात किंवा फक्त सुचक हसतात..
हे सगळं “आपण नक्की कुठं चाललं आहोत?” असा प्रश्न नक्की निर्माण करतं..
वाईट याचं वाटलं की ‘त्यानं’ व्यसन करणं म्हणजे फक्त ‘सरड्याची धाव शेवटी कुंपणापर्यंत’ ठरलं..!

इतकी सोपी व्याख्या मौजेची आणि नशेची? जी आहे बापाचा पैसा म्हणून विकत मिळते..

अडकवला कॅमेरा गळ्यात-धुंडाळलं जंगल-शोधली खेकड्याची नवीन प्रजाती..याला म्हणतात ‘कैफ’..!

आर्यनची ‘बातमी’ झाली पण अगदी त्याच्याहून लहान शाळकरी मुलं कोणकोणत्या व्यसनात अडकली नाहीयेत हे विचारा..
व्हाईटनर ही अगदी पहिली पायरी..!

माझ्या एका शाळकरी पेशंटनं गावाहून येतांना बस डोक्यावर घेतली कारण काय तर त्याला पेट्रोल हुंगायचं व्यसन होतं..
ड्रायव्हरला विनंती करत कसंबसं पेट्रोलपंपावर गाडी थांबवली आणि त्याच्या पालकांनी वीस रुपयात रुमाल पेट्रोलनं भिजवून घेतला आणि कसंबसं पुण्यापर्यंत आले..

मुळात संप्रेरकांमुळं या वयात व्यसनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते..
सुरुवातीला सहज गंमत म्हणून मुलं या व्यसनांकडं वळतात आणि नंतर ते व्यसन त्यांची गरज होते..

मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एकदा का व्यसन लागलं की ७० ते ९० टक्के व्यक्ती ते सोडण्यास तयार नसतात..

निकोटिनशिवाय एमडी व मॅफ्रेडॉनसारख्या अमली पदार्थाच्याही विळख्यात तरुणाई सोबत आता शाळकरी विद्यार्थीही अडकलेत..

जेलच्या ‘आत-बाहेर’ होणारे काही पेडलर्स माझे पेशंट आहेत..
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बुक’ या नावानं विद्यार्थ्यांमध्ये एक पावडर प्रसिद्ध आहे आणि याच वयोगटात केटामाईन, मॅजिक मशरूम यासारख्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे..

अगदी शाळकरी वयातली मुलं काय काय व्यसन करतात हे बर्‍याच जणांना सांगूनही पटणार नाही..

ग्लू-पेंट-ड्रायक्लिनिंगचं केमिकल-बॉण्ड-आयोडेक्स-स्टिकफास्ट-फेविक्विक-गॅसोलिन-हेअरस्प्रे-डिओड्रंट-थिनर-नेलपेन्ट रिमूव्हर-आयोडेक्स-पर्मनंट मार्कर-कोरेक्स आणि काय नाही? यात आता मुलीही मागं नाहीत..

बरं हे पदार्थ घेण्याच्याही वेगवेगळ्या अभिनव पद्धती आहेत..
▪️'डायरेक्ट अ‍ॅप्लिकेशन' म्हणजे थेट नाकात किंवा तोंडात उडवणं,बोटाला किंवा शर्टाच्या कॉलरला लावणं,रुमालास लावून हुंगणं..

▪️'बॅगिंग' म्हणजे कागद किंवा प्लास्टिकच्या पिशवीत तो पदार्थ उडवून त्यातून नाकाने आणि तोंडाने हवा आत घेणं..

▪️'हफिंग' म्हणजे या पदार्थानं भिजवलेला कपड्याचा तुकडा तोंडात ठेवणं..

▪️’स्निफिंग’ म्हणजे तो पदार्थ ज्या कंटेनरमध्ये आहे त्याचा नाकानं वास घेणं..

जवळपास हजारो असे पदार्थ आहेत जे अश्या प्रकारे वापरले जातात..
या पदार्थात असणाऱ्या रसायनात ब्युटेन,क्लोरोफ्लूरो कार्बन यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो ज्यामुळं थेट मेंदूला ‘किक’पोहोचते..

तुमच्या संबंधित-आजूबाजूच्या शाळकरी मुलांच्या कपड्यांवर पेंट किंवा ऑईलचे डाग असतील,ते जवळ आल्यावर एखाद्या केमिकलचा वास येत असेल,त्यांच्या तोंडाच्या आजूबाजूला चट्टे किंवा जखमा असतील,नाकातनं वारंवार पाणी वहात असेल,डोळे लाल दिसत असतील,नजर भिरभिरती असेल,नखांवर डाग असतील,स्वभाव चिडचिडा असेल,बोलण्यात अडखळत असतील तर आधी त्यांचे मित्र कोण आहेत याचा तपास करा,त्यांना विश्वासात घ्या..
प्रारंभी मौज वाटली तरी या सगळ्याचा परिणाम प्रामुख्यानं हृदय-त्वचा-पचन संस्था-श्वसनसंस्था-किडनी यासोबतच मेंदूवरही होतो..

ब्रेकिंग न्यूजचं काय?आज आहे उद्या दुसरी येईल पण या पिढीचं काय?यावर साकल्यानं कुणी बोलणार नाही हे सगळं जाणवलं म्हणून हा प्रपंच !

(डॉ.प्रज्ञावंत देवळेकर.)

error: Content is protected !!