अरुळेकर खोरकर रावराणे मंडळ ,मुंबई ही वैभववाडी तालुक्यातील १२ गावांतील रावराणे समाजाची आहे शिखर संस्था.
विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या रावराणे-इनामदार समाजातील ११२ बुद्धीवंत विद्यार्थांना एका शानदार कार्यक्रमात सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. ‘अरुळेकर खोरकर रावराणे मंडळ,मुंबई’ यांच्या वतीने शनिवारी मुलुंड येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रावराणे समाजातील असंख्य लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
अरुळेकर खोरकर रावराणे मंडळ ,मुंबई हे वैभववाडी तालुक्यातील बारा गावातील समाजाची शिखर संस्था आहे. या समाजातील महान व्यक्तींनी आणि शैक्षणिक संस्थांनी आता पर्यंत वैभववाडी तालुक्यातील गोर गरीब लोकांच्या मुलांसाठी शिक्षणाचा सोयी उपलब्ध करून देऊन समाज कार्य करीत आहे.
अरुळेकर खोरकर रावराणे, मंडळ, मुंबई यांच्या वतीने शनिवारी मुलुंड येथील छत्रपती संभाजी राजे सांस्कृतिक हॉल मध्ये रावराणे समाजातील दहावी,बारावी पदवी आणि पदवीत्तर परीक्षेत चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या सुमारे 112 बुद्धिमान विद्यार्थी आणि विद्यर्थिनीना शनिवारी प्रशस्ती पत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी समाजातील मान्यवर व्यक्ती श्री.भालचंद्र रावराणे, आणि डॉ.प्रा.सौ.सुलभा रावराणे यांनी विद्यार्थाना भावी वाटचाली बाबत मार्गदर्शन केले.ते मोलाचे ठरले आहे.मंडळाचे अध्यक्ष गणपत रावराणे यांनी मुंबईत मंडळाचे कार्यालय व्हावे,हक्काची जागा असावी की,त्यामुळे त्याचा समाज कार्यासाठी मोठा उपयोग होईल.म्हणून समाजातील लोकांनी पुढे येऊन आर्थिक हातभार लावावा असे उत्कट आवाहन केले. मंडळाचे उपाध्यक्ष सदानंद रावराणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करताना सांगितले की जेव्हा नोकरी धंद्यात मोठे व्हाल तेव्हा कृतज्ञता म्हणून समाजाच्या उन्नती साठी मागे वळून अवश्य पहावे किंवा सिंहावलोकन करावे.
मंडळाचे सचिव सुबोध रावराणे यानी प्रास्ताविक सादर करताना आता पर्यंत मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी झालेला खर्चाचा भार मंडळावर न टाकता मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी आणि समाजातील काही देणगीदारांनी दिलेल्या पैशातून करण्याचा परंपरा निर्माण करुन मंडळाने समाजासमोर व इतरांसाठीही आदर्श ठेवला आहे.
सागर रावराणे सूत्र संचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी गुण गौरव समितीने मेहनत घेतली. उपाध्यक्ष शैलेंद्र रावराणे यांनी सर्वांचे आभार मानले.