सहभागी खेळाडूंना जिल्हा संघटना अध्यक्ष संदेश पारकर व इतर पदाधिकार्यांनी दिल्या शुभेच्छा.
कणकवली | प्रतिनिधी : वर्धा येथील पुलगांव येथे १२ फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणार्या ३२ व्या राज्यस्तरीय तायक्वाॅन्दो स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ खेळाडू सहभागी झाले आहेत. तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यताप्राप्त तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व वर्धा जिल्हा तायक्वाँदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील पुलगांव येथील लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे कालपासून सुरू झाल्या असून त्या उद्या १४ फेब्रुवारी पर्यंत असणार आहेत.
या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ खेळाडू रवाना झाले आहेत मुलांमध्ये-कु प्रणय कुडाळकर कु. तन्वीर तांबे कु. गणराज शिरवळकर मुलींमध्ये – कु. राजलक्ष्मी कांबळे कु. सोनिया चोडनेकर कु. प्रजोती जाधव यांचा समावेश आहे. खेळाडूंसोबत टीम कोच अविराज खांडेकर व टीम मॅनेजर मानसी मुरकर आहेत.
सहभागी खेळाडूंना जिल्हा संघटना अध्यक्ष संदेश पारकर, उपाध्यक्ष सौ. राजश्री धुमाळे,कोषाध्यक्ष सुधीर राणे,विनायक सापळे, अमित जोशी,एकनाथ धनवटे,जयश्री कसालकर,नितीन तावडे आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.