राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज जाहीर केली रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती.
विवेक परब | ब्युरो चीफ : महाराष्ट्र राज्याचे नूतन राज्यपाल म्हणून श्री.रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ती नियुक्ती जाहीर केल्यानंतर त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन झाले आहे.
नूतन राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे आहे प्रदीर्घ राजकीय अनुभव..! कालावधी सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री असा स्वतंत्र प्रभार होता. राज्यपाल रमेश बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता ते रायपूर छत्तीसगडमध्ये रहातात. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्षही होते.
नगरसेवक- ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८० ते १९८४ या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते. १९८२ ते १९८८ या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पेलली तर १९८९ मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले आणि विजयी झाले.छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. ते एकूण ७ वेळा खासदार झाले. १९९८ साली ते पोलाद आणि खाण राज्यमंत्री
ऑक्टोबर १९९९ ते सप्टेंबर २००० रासायनिक खते राज्यमंत्री नंतर सप्टेंबर २००० जानेवारी ते २००३ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री जानेवारी २००३ जानेवारी २००४ खाण मंत्रालय, जानेवारी २००४ ते मे २००४ पर्यावरण आणि वन मंत्रालय २०१९ मध्ये त्रिपुराचे राज्यपाल आणि २०२१ मध्ये झारखंडचे राज्यपाल अशी त्यांची कारकीर्द आहे.